Meena Kumari : १९७२ मध्ये निर्माते सावन कुमार यांनी गोमती के किनारे या चित्रपटाची घोषमा केली. या चित्रपटात मीना कुमारी होत्या. सावन कुमार यांना मीना कुमारी यांनी विनंती केली होती की तुम्हीच हा चित्रपट दिग्दर्शित करा. मीना कुमारी यांच्या आयुष्यातला हा उतरणीचा काळ होता. त्या मद्याच्या आहारी गेल्या होत्या त्यांची प्रकृती खूप बिघडली होती. मीना कुमारी यांची प्रकृती चित्रपटाचं शुटिंग सुरु असतानाच खालावली. सावन कुमार यांना चित्रपटाचं शुटिंग थांबावावं लागलं आणि साहजिकच आहे त्यामुळे त्यांचा खर्च खूप वाढला. त्यावेळी मीना कुमारी यांनी वांद्रे भागात असलेला त्यांचा बंगला त्यांच्या सह अभिनेत्री मुमताज यांना विकला. मीना कुमारी यांनी दिवाळखोरीमुळे हा बंगला विकला अशा बातम्या त्यावेळी आल्या. मात्र मुमताज यांनी या घटनेमागे नेमकं काय घडलं होतं ते सांगितलं आहे.

मुमताज यांनी काय सांगितलं?

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी त्यावेळी काय घडलं होतं? त्या आठवणी उलगडल्या. मुमताज म्हणाल्या मीना कुमारींनी त्यांचा बंगला जेव्हा मला विकला तेव्हा अनेक बातम्या आल्या होत्या की मीना कुमारींना कर्ज झालं, मीना कुमारी दिवाळखोर झाल्या. मात्र वस्तुतः त्यांनी हा बंगला सावन कुमार यांना आर्थिक चणचण जाणवू लागल्याने विकला होता. सावन कुमार तक हा मीना कुमारी यांचा चांगला मित्र होता, आमचीही चांगली मैत्री होती. गोमती के किनारे चित्रपटात मीना कुमारी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडचणी येऊ लागल्या. चित्रपट थांबू नये म्हणून तो बंगला त्यांनी मला विकला. त्यावेळी मी एक चित्रपट करायचे साडेसात लाख रुपये घेत असे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी मी एक होते.” असं मुमताज म्हणाल्या.

सावन कुमार यांच्या मीना कुमारींना काय सांगितलं?

सावन कुमार यांनी मीना कुमारींना सांगितलं की मुमताज यांचे पाच लाख रुपये अद्याप देणं बाकी आहे. त्यावेळी खूप आजारी झालेल्या मीना कुमारी मला म्हणालया मी तुला पेमेंट ऐवजी माझा बंगला दिला तर चालेल का? सुरुवातीला मी थोडी गोंधळले होते. कारण तो बंगला मीना कुमारी यांनी स्वतःसाठी बांधळा होता. पण त्या मला म्हणाल्या की मी आता फार काळ जगणार नाही. त्यांना ती जाणीव झाली होती की त्यांचं आयुष्य संपत चाललं आहे. त्यामुळे तो बंगला मी घेतला असं मुमताज यांनी सांगितलं. मीना कुमारी यांना कुठलीही आर्थिक अडचण आलेली नव्हती असंही मुमताज यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीना कुमारींना आर्थिक दिवाळखोरी वगैरे काहीही आलेली नव्हती-मुमताज

मुमताज यांनी रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं, त्यावेळी अनेक बातम्या आल्या होत्या की मीना कुमारी यांना बँकेचं कर्ज झालं. त्यांना आर्थिक दिवाळखोरी आली त्यामुळेच त्यांनी मला बंगला विकला वगैरे वगैरे. पण त्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नव्हतं. त्यांना काही कुटुंब वगैरे नव्हतं. तो बंगला तसाच बेवारस पडून राहिला असता किंवा कालांतराने सरकारजमा झाला असता त्यापेक्षा त्यांनी तो मला दिला. तो बंगला माझ्यासाठी खूप लकी ठरला. मी त्या बंगल्यात राहू लागले आणि माझं चांगलं करिअर करु शकले असं मुमताज यांनी सांगितलं.