Sunny Deol-Meenakshi Sheshadri: मीनाक्षी शेषाद्री ८० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'पेंटर बाबू' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मिनाक्षीला 'हिरो' सिनेमातून ओळख मिळाली. या सिनेमाने तिला रातोरात स्टार बनवलं. यानंतर तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली होती. करिअरमध्ये तिने अनिल कपूर, अमिताभ बच्चन आणि सनी देओल यासह त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसह काम केलं. यापैकीच तिचा 'डकैत' चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील सनी देओल व मीनाक्षीच्या किसिंग सीनची खूप चर्चा झाली होती. पहिल्यांदाच स्क्रीनवर किसिंग सीन करण्याचा अनुभव मिनाक्षीने सांगितला होता. "सनी देओलसोबत किसिंग सीन करताना मी खूप घाबरले होते. पण सनी रिलॅक्स होता. सनी जेंटलमन आहे," असे मिनाक्षी झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. या चित्रपटात दोन्ही कलाकारांवर एक रोमँटिक गाणंही शूट करण्यात आलं होतं. यात सनी बोटीमध्ये असतो, या गाण्यात सुरुवातीलाच सनी व मिनाक्षीचा किसिंग सीन होता. हा किसिंग सीन करताना आपण अस्वस्थ झाल्याचं मिनाक्षीने सांगितलं होतं. जुन्या विचारांची असल्याने हा सीन करताना त्रास झाला होता, असंही मिनाक्षी म्हणाली होती. “माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना मिनाक्षीने यावेळी सनी देओलच्या स्वभावाबाबतही खुलासा केला होता. सनी जेंटलमन आहे, त्याच्याबरोबर काम करताना अडचणी आल्या नाही. त्याच्याबरोबर बरेच चित्रपट केले आहेत, त्यामुळे आमच्यात चांगले बाँडिंग आहे, असं मिनाक्षी म्हणाली होती. मिनाक्षी शेषाद्री (फोटो - इन्स्टाग्राम) वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली मिनाक्षी चित्रपटांशिवाय मीनाक्षी शेषाद्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. कुमार सानूचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते, अशा चर्चाही एकेकाळी खूप झाल्या होत्या. 'जुर्म' चित्रपटातील 'जब कोई बात बिगड जाये' हे प्रसिद्ध गाणंही कुमार सानूने गायलं होतं. या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये तो मिनाक्षीला भेटला आणि तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला, त्यावेळी तो आधीच विवाहित होता, असं म्हणतात. तसेच दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनीही मीनाक्षीला लग्नासाठी प्रपोज केले होते. मात्र, अभिनेत्रीने नकार दिला होता, यानंतर त्यांनी तिला 'दामिनी' चित्रपटातून काढून टाकलं होतं. पण निर्मात्यांनी मीनाक्षीला पुन्हा चित्रपटात घेतलं होतं. रेखा यांनी धावत जाऊन जया बच्चन यांना मारली होती मिठी, दोघींनी एकत्र उभे राहून अमिताभ बच्चन यांना… लग्नानंतर मिनाक्षीने सोडली सिनेसृष्टी मीनाक्षीने १९९६५ मध्ये बँकर हरीश म्हैसूरशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुलं आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून चाहत्यांबरोबर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.