Dharmendra’s GrandDaughter Is Away Frome Limelight : देओल कुटुंबात अनेक कलाकार आहेत आणि अभिनेते धर्मेंद्र, सनी देओल व बॉबी देओल यांनी मोठा पडदा गाजवला आहे. परंतु, घरातून अभिनयाचा वारसा असतानाही धर्मेंद्र यांच्या नातीने मात्र एका वेगळ्याच क्षेत्राची निवड केली. ती अभिनयापासून दूर असून एका वेगळ्या क्षेत्रात काम करतेय.

धर्मेंद्र यांना चार मुली व दोन मुलं अशी एकूण सहा मुलं आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर व त्यांना सनी देओल, बॉबी देओल अजिता देओल आणि विजेता देओल अशी चार मुलं आहेत; तर यातील त्यांची लेक विजेता देओल लग्नानंतर विजेता गिल झाली. तिच्या लेकीने अभिनय नाही तर एका वेगळ्या क्षेत्राची निवड केली असून तिथे ती स्वत:ची ओळख बनवू पहात आहे. चला तर जाणून घेऊयात धर्मेंद्र यांची नात नेमकी कोणत्या क्षेत्रात आहे.

धर्मेंद्र यांची नात ‘या’ क्षेत्रात कमावतेय नाव

‘फ्री प्रेस जरनल’च्या वृत्तानुसार धर्मेंद्र यांची लेक व सनी देओलची सख्खी बहीण विजेता देओलची लेक प्रेरणा गिल अभिनय क्षेत्रापासून दूर असून ती एक लेखिका आहे. दिल्लीत स्थायिक असलेल्या प्रेरणाने या क्षेत्रात लेखिका म्हणून नाव कमावलं आहे. तिला स्टोरी टेलिंगचीही आवड आहे. तिने २०१५ मध्ये पहिलं पुस्तक लिहिलं होतं. नुकतंच तिचं meanwhile हे पस्तक प्रदर्शित झालं.

प्रेरणा लाइमलाइटपासून दूर असली तरी ती अनेकदा देओल कुटुंबाबरोबर कार्यक्रमांना हजेरी लावायची. तर तिचे मामा सनी देओल व बॉबी देओल यांनीही तिच्या पुस्तकांचं प्रमोशन केलं आहे.

दरम्यान, उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार प्रेरणाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर प्रेरणा तिचा नवरा पुल्कित देवडा या दिल्लीतील वकिलाबरोबर सुखाने तिचं आयुष्य जगत आहे. या दोघांनी २०१७ मध्ये लग्न केलं. दोघांनाही ट्रॅव्हल, आर्ट आणि साहित्याची आवड आहे. ती सोशल मीडियावर तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार काही पोस्ट करत नाही.