mili actress janhvi kapoor get trolled on sami sami song at dubai event spg 93 | "दाक्षिणात्य चित्रपट चोरता आता...." 'सामी सामी' गाण्यावरून बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला केलं ट्रोल | Loksatta

“दाक्षिणात्य चित्रपट चोरता आता…” ‘सामी सामी’ गाण्यावरून बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला केलं ट्रोल, video viral

रश्मिका इतका सुंदर डान्स या गाण्यावर कोणीच करू शकत नाही

“दाक्षिणात्य चित्रपट चोरता आता…” ‘सामी सामी’ गाण्यावरून बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला केलं ट्रोल, video viral
पुष्पा चित्रपटातील सुपरहिट गाणे

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना या जोडीचा सुपरहिट ठरलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाची लोकप्रियता आजही आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटातील कथेप्रमाणे यातील गाणीदेखील सुपरहिट ठरली आहेत. यातील ‘सामी सामी’ हे गाणे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. रश्मिका या गाण्यावर नृत्य करताना दिसली आहे. मात्र आता या गाण्यावर एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीने डान्स केला आहे ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सध्या बॉलिवूडचे अनेक कलाकार दुबई येथे फिल्मफेअरच्या कार्यक्रमासाठी गेले आहेत. तिथे हे कलाकार आपापले परफॉर्मन्स सादर करत आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर हिने यावेळी ‘सामी सामी’ या गाण्यावर डान्स केला आहे. या डान्सने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

“उपचारासाठी पैसे नव्हते पण…” विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरने सांगितला तबस्सूम यांच्याबद्दलचा ‘तो’ किस्सा

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कॉमेंट्स करण्यास सुरवात केली. एकाने लिहलं आहे ‘थोडी मेहनत कर आणखीन असे गाणे तुला देखील मिळेल’, तर एकाने लिहले आहे ‘रश्मिका इतका सुंदर डान्स या गाण्यावर कोणीच करू शकत नाही.’ एकाने तर लिहले आहे ‘ही रश्मिकाला कॉपी करत आहे.’ ‘दाक्षिणात्य चित्रपटांची गाणी कॉपी करणं बंद करा’ असं एकाने सुचवले आहे मात्र काही जणांनी तिचे कौतुकदेखील केले आहे.

जान्हवीचा नुकताच ‘मिलि’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवीने प्रथमच वडील बोनी कपूर यांच्याबरोबर काम केलं आहे. ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-11-2022 at 13:11 IST
Next Story
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ‘दृश्यम २’ची रेकॉर्डब्रेक कमाई, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला