scorecardresearch

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला कतरिना कैफबरोबर करायचा होता रोमान्स, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्रीने व्यक्त केलेली कतरिना कैफबरोबर रोमान्स करण्याची इच्छा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला कतरिना कैफबरोबर करायचा होता रोमान्स, इच्छा व्यक्त करत म्हणाली…
मिनिषा लांबाचा आज वाढदिवस आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बचना ए हसीनो’, ‘किडनॅप’, ‘वेल डन अब्बा’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मिनिषा लांबाचा आज ३८वा वाढदिवस आहे. २००५ साली ‘यहां’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बोल्ड अंदाजामुळे चाहत्यांना घायाळ करणारी मिनिषा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. मिनिषाने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफबाबत केलेल्या वक्तव्याचीही बरीच चर्चा रंगली होती.

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केलेल्या मिनिषाला बॉलिवूडमध्ये मात्र फार जम बसवता आला नाही. बॉलिवूड चित्रपटांबरोबरच ती ‘कॅडबरी’, ‘हाजमोला’, ‘एअरटेल’, ‘सनसिल्क’ यांसारख्या अनेक ब्रॅण्डच्या जाहिरातीत झळकली. मिनिषा लांबाला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात “समलैंगिक (लेसबियन) आधारित चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर कोणत्या अभिनेत्रीबरोबर काम करायला आवडेल?”, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

हेही वाचा>>‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

हेही वाचा>> राखी सावंतचा गर्भपात झाल्याच्या चर्चांवर आदिल खानने सोडलं मौन, म्हणाला…

मिनिषा लांबाने या प्रश्नाचं उत्तर देताना बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचं नाव घेतलं होतं. याबरोबरच तिच्याबरोबरच रोमान्स करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली होती. “समलैंगिक चित्रपटाची ऑफर मिळाली तर मला कतरिना कैफबरोबर काम करायला आवडेल. तिच्याबरोबर रोमान्स करायलाही मला आवडेल”, असं मिनिषा म्हणाली होती. मिनिषाच्या या वक्तव्याची बरीच चर्चा रंगली होती.

हेही पाहा>> रितेश देशमुख-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या

मिनिषा लांबा सध्या बॉलिवूडपासून लांब आहे. परंतु, ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मिनिषा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 19:04 IST

संबंधित बातम्या