ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कोलकात्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज (१० फेब्रुवारी) सकाळी अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिथुन चक्रवर्ती यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्यावर सध्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “ते १००% ठीक आहेत आणि हे त्यांचे रुटीन चेकअप आहे,” अशी माहिती त्यांचा मोठा मुलगा मिमोहने ‘इंडियन एक्सप्रेस’ ला दिली.

Doctors should prescribe only the medicines available in the hospital say new founder of Sassoon Dr Eknath Pawar
खबरदार, रुग्णांना बाहेरून औषधे आणायला लावली तर… ससूनचे नवे अधिष्ठाता डॉ. पवार यांची डॉक्टरांना तंबी
pune, Sassoon Hospital, Frequent Changes in Sassoon Hospital dean, administrative Confusion over Sassoon Hospital dean Frequent Changes, controversial sasoon hospital,
‘ससून’मधील गोंधळ संपेना! तीन आठवड्यांत पुन्हा नवीन अधिष्ठाता नेमण्याचा प्रकार
pune porsche crash police custody of agarwal couple along with doctor increase till 10 june
पुणे: रक्ताचा नमुना आईचाच; न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, अगरवाल दाम्पत्यासह डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत वाढ
A retired municipal officer and his son were found dead in a suspicious condition in their house in Nagpur
मुलगा सोफ्यावर मृतावस्थेत तर वडील स्नानगृहात विवस्त्र……नागपुरातील गुलमोहरनगरात अजब….
private hospitals in Pune taking collective steps to overcome challenges in emergency medical care
पुणे :रुग्णांच्या आपत्कालीन सेवेसाठी डॉक्टरांचा पुढाकार! पुण्यातील खासगी रुग्णालयांनी उचललं पाऊल
pune Porsche car accident
पुणे अपघात प्रकरण : समितीचा अहवाल सादर; डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांचे निलंबन तर डॉ. विनायक काळे यांना सक्तीची रजा
karan singh
ब्रिजभूषण सिंहांच्या मुलाच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू; तरुणांकडून चक्काजाम!
Kirti Vyas, murder,
कीर्ती व्यास हत्या प्रकरण : सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानीला जन्मठेप

वर्ष होण्याआधीच मोडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसरं लग्न? पतीचं विदेशातील घर सोडून भारतात परतली, तिची टीम म्हणाली…

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते व भारतीय जनता पक्षाचे नेते मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहिर झाला. पुरस्काराची घोषणा झाल्यावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला होता. “मला हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी स्वतःसाठी कधीच कोणाकडे काहीही मागितलं नाही. न मागता काहीतरी मिळाल्याची भावना काय असते ते आज मी अनुभवत आहे. ही एक वेगळीच आणि खूप छान भावना आहे,” असं ते म्हणाले होते.