scorecardresearch

Premium

आदित्य ठाकरेंनी शेअर केले परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या लग्नातील Unseen Photos, लूकने वेधलं लक्ष

आदित्य ठाकरेंनी शेअर केलेले राघव-परिणीती यांच्या लग्नातील खास फोटो पाहिलेत का?

Aditya Thackeray at raghav chadha parineeti chopra wedding
आदित्य ठाकरेंनी शेअर केलेले राघव-परिणीतीच्या लग्नातील फोटो (फोटो – आदित्य ठाकरे इन्स्टाग्राम)

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा रविवारी (२४ सप्टेंबर रोजी) विवाहबंधनात अडकले. त्यांनी उदयपूर येथील द लीला पॅलेसमध्ये शाही सोहळ्यात लग्नगाठ बांधली. या लग्नातील फोटो आता समोर येत आहेत. परिणीती व राघव यांच्या लग्नात आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. या सोहळ्यातील फोटो आदित्य यांनी शेअर केले आहेत.

Video: प्रियांका चोप्रा परिणीती-राघवच्या लग्नाला का आली नाही? आई मधू चोप्रांनी सांगितलं कारण; म्हणाल्या…

thalaivar170
१७० वा चित्रपट ठरणार रजनीकांत यांच्यासाठी खास; ३२ वर्षांनी थलाईवा व महानायक एकत्र, निर्मात्यांची मोठी घोषणा
kamal-haasan-suicidal thoughts
कमल हासन यांच्याही डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार; तरूणांशी संवाद साधताना अभिनेत्याचा मोठा खुलासा
subhedar director digpal lanjekar new project
‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकर मांडणार मराठवाड्याच्या संघर्षाची कथा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या कलाकृतीचा शुभारंभ
supriya-sule
चांगला नेता कोण? ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर सुप्रिया सुळे यांचा खुलासा; जालन्यातील घटनेवरही केलं भाष्य

आदित्य ठाकरे राघव व परिणीतीच्या लग्नासाठी शनिवारी उदयपूरला गेले होते. या लग्नाला हजेरी लावणाऱ्या काही मोजक्या राजकीय नेत्यांपैकी आदित्य ठाकरे हे एक होते. आता त्यांनी लग्नातील फोटो शेअर केले आहेत. यात आदित्य यांनी लग्नाची थीम असलेल्या ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता व त्यावर मल्टिकलर प्रिंटेड जॅकेट घातलं आहे. “तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन. तुम्हाला आयुष्यभर आनंद, उत्तम आरोग्य आणि प्रेम मिळो ही सदिच्छा,” असं कॅप्शन देत आदित्य यांनी फोटो शेअर केले आहेत.

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा दोघांनी मे महिन्यात दिल्लीत साखरपुडा केला होता. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी आता लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mla aditya thackeray shared unseen photos from raghav chadha parineeti chopra wedding hrc

First published on: 27-09-2023 at 09:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×