scorecardresearch

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘भोला’ची दमदार कमाई; अजयला नव्या रुपात बघण्यात प्रेक्षक उत्सुक

अजय देवगण आणि तब्बू स्टारर चित्रपट भोला 30 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाचे आगाऊ बुकिंगमध्ये मोठी कमाई केली आहे.

bhola
भोलाच्या कमाईत पाचव्या दिवशीही घसरण (संग्रहित छायाचित्र)

‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’नंतर आता सर्वांच्या नजरा अजय देवगणच्या मोस्ट अवेटेड आगामी ‘भोला’ या चित्रपटाकडे लागल्या आहेत. ‘दृश्यम २ ‘च्या सुपर-सक्सेसनंतर, अजय पुन्हा एकदा ‘भोला’मधून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. अजय देवगणच्या आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलरबद्दल रिलीजपूर्वी बरीच चर्चा आहे. एवढंच नाही तर भोलाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे.

हेही वाचा- परिणीती चोप्रा-खासदार राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार? दोन्ही कुटुंबियांची बोलणी सुरू

रविवारपासून ‘भोला’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अजयने स्वतः स्टार तब्बूसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली. त्यानंतर अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाची तिकिटे ॲडव्हान्स बुकींगच्या दृष्टीने विकली जाऊ लागली. आगाऊ बुकिंग सुरू झाल्यापासून २-३ तासांच्या आत देशभरात IMAX आणि 4DX आवृत्तीसह १२०० हून अधिक तिकिटे विकली गेली होती. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी ७ लाखांहून अधिक कमाई केली होती. आत्तापर्यंत भोलाची ५० हजाराहूंन अधिक ॲडव्हान्स तिकीट विकली गेली आहेत.

हेही वाचा- गौरी खानने शेअर केला लेटेस्ट फॅमिली फोटो; म्हणाली, “कुटुंब ते जे..”

अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले होते आणि त्यात कार्थी मुख्य भूमिकेत होते. दुसरीकडे, ‘भोला’च्या कथेबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात एका माणसाची कथा दाखवण्यात आली आहे जो १० वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर आपल्या मुलीला भेटतो. परंतु त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चित्रपटात अजय देवगणशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 11:26 IST

संबंधित बातम्या