Mouni Roy Suraj Nambiar Divorce Rumors : ‘नागिन’, ‘देवों के देव महादेव’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच मौनी रॉय. टेलिव्हिजन गाजवल्यावर मौनीने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण, सध्या मौनी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत.

मौनी रॉयने जानेवारी २०२२ मध्ये सूरज नांबियारशी लग्न केलं. आता लग्नानंतर चार वर्षांनी हे जोडपं विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मौनी रॉय आणि सूरज यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

मौनी कायम आपल्या पतीबरोबर रोमँटिक फोटो, व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. पण, गेल्या अनेक दिवसांपासून तिने पतीबरोबरचे फोटो शेअर केलेले नाहीयेत. मात्र, मौनीच्या इन्स्टा प्रोफाइलवर तिच्या लग्नातील काही फोटो अजूनही कायम आहेत.

या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्येही अभिनेत्रीकडे याबाबत विचारणा केली आहे. एक युजर विचारतो, “तुम्ही तुमच्या लग्नाचे फोटो का काढून टाकले? लवकरच घटस्फोट घेणार आहात का?”, तर दुसरा युजर म्हणतो, “तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे…मग नक्की काय झालंय?”

मौनी व सूरज या दोघांनीही घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाहीये. सूरजबद्दल सांगायचं झालं, तर तो दुबईमध्ये स्थायिक आहे. सूरज Investment Banker असून तो मूळचा बंगळुरूचा आहे. या जोडप्याने जानेवारी २०२२ मध्ये गोव्यात लग्नगाठ बांधली होती. मल्याळी आणि बंगाली अशा दोन्ही संस्कृतीनुसार या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता.

Mouni Roy Divorce Rumors
मौनी रॉयने पतीला केलं अनफॉलो ( Mouni Roy Suraj Nambiar Divorce Rumors )

दरम्यान, सूरज आणि मौनीची पहिली भेट २०१९ मध्ये झाली होती. तेव्हापासूनच यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. मौनी-सूरजने अनेक वर्षे त्यांचं नातं रिव्हिल केलं नव्हतं. जवळपास २-३ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडप्याने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. आता घटस्फोटाच्या चर्चांवर हे दोघंही कधी प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.