scorecardresearch

२१व्या वर्षी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा करणाऱ्या मुलीची गोष्ट मोठ्या पडद्यावर; मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या काश्मिरी मुलीची गोष्ट रुपेरी पडद्यावर

२१व्या वर्षी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा करणाऱ्या मुलीची गोष्ट मोठ्या पडद्यावर; मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
श्रद्धा कपूर रुखसाना कौसरची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘उरी’, ‘राझी’, ‘नीरजा’ हे सत्य घटनेवर आधारित बॉलिवूड चित्रपट गाजले. आता लवकरच आणखी एक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००९ साली लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या २१ वर्षीय काश्मिरी मुलीच्या शौर्याची कहाणी रुपेरी पडद्यावर येणार आहे.

रुखसाना कौसरने लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं होतं. २७ सप्टेंबर २००९ रोजी काश्मिरमध्ये वास्तव्यास असलेल्या रुखसानाच्या काकांच्या घरात दहशतवादी जबरदस्तीने घुसले होते. त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या रुखसानाला सुपुर्द करा, अशी मागणी ते करत होते. रुखसानाच्या काकांनी दरवाजा उघडण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी खिडकीद्वारे घरात प्रवेश करत कुटुंबियांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात लपून बसलेल्या रुखसानाने दहशतवाद्यांचा प्रमुख असलेल्या अबू ओसामावर कुऱ्हाडीने वार केला.

हेही वाचा>> “मला गुप्तांगाचा फोटो…” ‘मिस मार्वेल’ फेम अभिनेत्यावर महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

रुखसानाने त्यानंतर दहशतवाद्याच्या बंदुकीनेच त्याच्यावर गोळी झाडली. रुखसानाने तिच्या कुटुंबियांच्या मदतीने दहशतवाद्यांना ठार करत प्राण वाचवले. रुखसानाला तिने दाखविलेल्या हिंमतीसाठी शौर्य पुरस्कार, सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, सरदार पटेल पुरस्कार, झाशीची राणी शौर्य पुरस्कार व अस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २०१३ मध्ये तिला पोलीस हवालदार म्हणून पोलिसांत भरती करुन घेतलं गेलं.

हेही वाचा>> गरोदर असल्याच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन, म्हणाली…

रुखसानाच्या शौर्याची कथा कित्येक महिला व मुलींसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे लवकरच तिची कहाणी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात तिची भूमिका साकारण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला विचारण्यात आलं असल्याची माहिती आहे. यावर अभिनेत्रीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, “ २० वर्षीय रुखसानाच्या भूमिकेला श्रद्धा कपूर चांगला न्याय देऊ शकेल, अशी चित्रपट दिग्दर्शकाला खात्री आहे” असं जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे.   

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:57 IST

संबंधित बातम्या