अजय देवगण अभिनीत ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून सस्पेन्स-ड्रामा फ्रँचायझीचा शेवट होणार असून, ही कथा शेवटची मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत आहे मात्र विजय साळगावकर म्हणून त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची ही शेवटी संधी आहे. तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, कमलेश सावंत, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव हे कलाकारही त्यांच्या जुन्या भूमिका साकारत आहेत. तर जयदीप अहलावत आणि प्रकाश राज नव्या भूमिकांमध्ये या कलाकारांच्या टीममध्ये सहभागी झाले आहेत.
मात्र गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे ती चित्रपटात अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल जाधव हिची. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’मध्ये विजय साळगावकरची धाकटी मुलगी अनु साळगावकरची भूमिका साकारून मृणाल लोकप्रिय झाली. आता ‘दृश्यम ३’मध्येही ती पुन्हा अनुच्या भूमिकेत दिसत
मृणाल जाधवचा जन्म आणि कुटुंब
मृणाल जाधवचा जन्म उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईतच झाला असून तिचे वडील रवींद्र जाधव हे पोलीस अधिकारी असून आई संगीता जाधव गृहिणी आहेत. मृणाल वयाच्या अवघ्या चार वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. २०१२ मध्ये ‘राधा ही बावरी’ या मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर २०१४ मध्ये रितेश देशमुखबरोबर ‘लय भारी’ या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
यानंतर मृणालने ‘अ पेइंग घोस्ट’ (२०१५), ‘तू ही रे’ (२०१५), २०१७ मधील फँटसी कॉमेडी-ड्रामा ‘अंद्या चा फुंडा’ आणि २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भयभीत’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं.
मात्र, अजय देवगण अभिनीत ‘दृश्यम’ चित्रपटातील अनु साळगावकरच्या भूमिकेने मृणालला मोठी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘दृश्यम २’मध्येही तिने अनुची भूमिका साकारली. आता २०२६ मध्ये ‘दृश्यम ३’मधून मृणाल पुन्हा एकदा अनु साळगावकरच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
मृणाल सध्या ‘दृश्यम ३’च्या प्रमोशनमुळे चर्चेत आहे. नुकतीच ती ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या सीझन ५च्या पहिल्या भागात ‘दृश्यम ३’च्या कलाकारांबरोबर दिसली होती.
