Mrunal Thakur Best Friend : बॉलीवूडसह दाक्षिणात्य कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मृणाल ठाकूरला ओळखलं जातं. हिंदी मालिकांमुळे मृणाल घराघरांत लोकप्रिय झाली होती. यानंतर तिने रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेण्याचा निर्णय घेतला. ‘हाय नाना’, ‘सीतारामम’, ‘द फॅमिली स्टार’ अशा गाजलेल्या साऊथ चित्रपटांमध्ये मृणालने काम केलंय. पण, मृणालचा इंडस्ट्रीतील हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. यासाठी अभिनेत्रीने प्रचंड मेहनत घेतलीये. यादरम्यान, तिची एका लोकप्रिय अभिनेत्रीशी फार घट्ट मैत्री झाली. मृणालची ही जिवलग मैत्रीण नेमकी कोण आहे पाहुयात…
मृणाल ठाकूरने नुकतीच रणवीर अलाहाबादियाच्या (BeerBiceps) पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी तिला “या इंडस्ट्रीमध्ये तुझी सर्वात चांगली मैत्रीण आणि तुझ्या जवळची व्यक्ती कोण आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर मृणाल ठाकूर म्हणाली, “तमन्ना भाटिया….ती खूपच चांगली आहे. आजवर तिने मला खूप पाठिंबा दिलाय. खरं सांगायचं झालं, तर आता तमन्ना मला माझ्या बहिणीसारखी आहे…इतकं खास बॉण्डिंग आमचं तयार झालंय, आणि हे नातं खूप जवळचं आहे.”
“तिच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय…”
“आयुष्यात एक तरी खूप खास आणि जिवलग मैत्रीण असावी, असं माझं ठाम मत आहे. आधी मला असं वाटायचं नाही पण, आता माझे विचार बदलले आहेत. आता मी ‘गर्ल फ्रेंडशिप’ खूप जास्त एन्जॉय करतेय. एकत्र मजा करायची, मस्त आयुष्य जगायचं, एकमेकींना कायम पाठिंबा द्यायचा, प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कधी आपल्याला गरज वाटेल तेव्हा एकमेकींच्या पाठिशी ठामपणे उभं राहायचं यालाच माझ्यामते ‘गर्ल फ्रेंडशिप’ म्हणतात…. एकमेकींना पाठिंबा द्यायचा सुखात सुद्धा अन् दु:खात सुद्धा!”
“तमन्नाला मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगते. मला वाटतं, तिच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. आम्ही दोघी हैदराबादला जाताना विमानात एकमेकींना पहिल्यांदा भेटलो होतो. त्यानंतर हळुहळू आमच्यात छान मैत्री झाली, आणि आता आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी नाहीतर ‘बहिणी’ आहोत.”
मृणाल ठाकूर आणि तमन्ना भाटिया या दोघीही एकमेकींच्या गेल्या अनेक वर्षांपासून जिवलग मैत्रिणी आहेत. त्या दोघी एकमेकींच्या बर्थडे पार्टीज आणि त्यांच्या आयुष्यातील खास moments जसं की सिनेमाच्या प्रीमियर शोज मध्येही एकत्र दिसतात.
