scorecardresearch

थकलेला चेहेरा, डोळ्यात दाटलेलं पाणी; मृणाल ठाकूरने ‘तो’ फोटो शेअर करत मांडली तिची व्यथा

या फोटोनंतर लगेचच मृणालने इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला

mrunal thakur
फोटो : सोशल मीडिया

हिंदी मालिका ते बॉलिवूड असा अभिनेत्री मृणाल ठाकूरचा प्रवास फारच कौतुकास्पद आहे. हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बॉलिवूडमध्ये मृणालने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नव्हे तर तिचा ‘सीता रामन’ हा तेलुगू चित्रपटही अलिकडेच प्रदर्शित झाला. आपल्या कामामुळे प्रकाशझोतात आलेली मृणाल सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

मृणाल ठाकूरचा एक लेटेस्ट फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. या फोटोत मृणाल ठाकूर रडताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर या फोटोद्वारे मृणालने तिची व्यथा मांडली आहे. मृणालने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला आहे. मृणाल ठाकूरच्या या इन्स्टा स्टोरी फोटोमध्ये तिचे डोळे पाणावलेले दिसत आहेत.

आणखी वाचा : कीर्ती सुरेशने ‘दसरा’ चित्रपटाच्या टीमला वाटली ७५ लाखांची सोन्याची नाणी; नेमकं कारण काय?

मृणाल ठाकूरने या फोटोबरोबर लिहिले की – “‘कालचा दिवस कठीण होता, पण आज मी सावरले आहे. आज मी आनंदी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील कथांमध्ये अनेक पानं आहेत, परंतु प्रत्येकजण ती मोठ्याने वाचत नाही, परंतु मी माझ्या आयुष्याच्या पुस्तकातील काही पाने मोठ्याने वाचणार आहे कारण या परिस्थितीतून मी जो धडा शिकले तोच धडा कदाचित आणखी कोणीतरी शिकण्याची गरज आहे.” तिच्या या फोटोमागे नेमकं कारण अजूनतरी स्पष्ट झालेलं नाही, पण काही मीडिया रीपोर्टनुसार तिचं ब्रेकअप झाल्यामुळे तिने अशी पोस्ट केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

mrunal thakur post
mrunal thakur post

या फोटोनंतर लगेचच मृणालने इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्येसुद्धा ती हेच सांगताना आपल्याला दिसत आहे. ती आज खूप आनंदी असल्याचं तिने तिच्या चाहत्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. नुकतंच मृणाल अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीच्या ‘सेल्फी’ चित्रपटात एक गाण्यात दिसली. याबरोबरच आदित्य रॉय कपूरबरोबर ‘गुमराह’ या चित्रपटात मृणाल झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 17:06 IST

संबंधित बातम्या