scorecardresearch

Premium

Video “आपण निरोप घेऊ शकलो नाही पण…”; सुशांतच्या आठवणीत दिशा पटानी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

‘एमएस धोनी’ चित्रपटाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त दिशाने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.

ms-dhoni flim-completed-7-year
'एमएस धोनी' चित्रपटाला सात वर्ष पूर्ण

भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतने महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर दिशा पटानी आणि कियारा अडवाणी यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात कियाराने एमएस धोनीच्या पत्नीची तर दिशाने त्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

हेही वाचा- “दारूचं व्यसन, सलग फ्लॉप चित्रपट अन्…”, आलियाने सांगितला वडील महेश भट्ट यांचा संघर्ष; म्हणाली, “माझी आई…”

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
The great indian family
विकी कौशलच्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ची पहिल्या दिवशी निराशाजनक कामगिरी, केली ‘इतकी’ कमाई
The vaccine war
“या चित्रपटाची गोष्ट…”, गिरीजा ओकने उघड केलं ‘द व्हॅक्सिन वॉर’बद्दलचं मोठं गुपित, म्हणाली…
jawan-unknown-facts
शाहरुख खानच्या ‘जवान’बद्दलची ‘ही’ ४ सिक्रेट्स तुम्हाला ठाऊक आहेत का? जाणून घ्या

हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने दिशा पटानीने सुशांतच्या आठवणीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एमएस धोनीची एक छोटी क्लिप शेअर केली आहे, हा व्हिडीओ शेअर करत दिशाने लिहिले “या सुंदर प्रवासाबद्दल आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील माझा पहिला चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे. मनापासून प्रेम करा आणि अशा लोकांची कदर करा जे तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदित करतात. आपण निरोप घेऊ शकलो नाही पण मला आशा आहे की तू आनंदी असशील.”

दिशा पटानीच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणत कमेंट करत आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहले. “मी सुशांतला कधीच विसरत नाही, मला प्रत्येक वेळी त्याची खूप आठवण येते. हा माझा चित्रपटगृहात जाऊन बघितलेला शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर मी कधीच चित्रपटगृहात गेलो नाही”. दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहले, सुशांत मला तुझी खूप आठवण येते. तर आणखी एका युजरने कमेंट करत या चित्रपटातील दिशाच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ms dhoni flim completed 7 year disha patani shares emotional post remembering sushant singh rajput dpj

First published on: 01-10-2023 at 14:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×