चित्रपटात नायकाची भूमिका जितकी महत्त्वाची असते, तितकीच खलनायकाची भूमिकादेखील महत्त्वाची असते. नायकाइतकीच खलनायकाची भूमिका ताकदीची असेल, तर चित्रपट वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचतो. अशी भूमिका करणाऱ्या कलाकारांवर त्या पात्राला न्याय देण्याची जबाबदारी असते. भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी नायकाच्या भूमिकेतून नव्हे तर खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आपल्या अभिनयाने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अशा दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणजेच मुकेश ऋषी हे आहेत.

काय म्हणाले मुकेश ऋषी?

अभिनेते मुकेश ऋषी यांनी नुकतीच रेडिओ नशाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल वक्तव्य केले आहे. ते म्हणतात, “सलमान कधीच त्याच्या रूममध्ये थांबत नसे. त्याला त्याच्या मित्रांबरोबर बाहेर जायला आवडायचे. तो अनेकदा बारमध्ये आनंद घेत असायचा आणि आजही तो तसाच आहे. आम्ही शूटिंग व्यक्तिरिक्त खूप एकत्र वेळ घालवला आहे. शूटिंग झाल्यानंतर आम्ही दोघे एकत्र व्यायाम करायचो, कधी बाहेर फिरायला जायचो. आम्ही जेव्हा एकमेकांबरोबर काम करत होतो, त्याचवेळी आम्ही एकमेकांना जाणूनदेखील घेत होतो. त्यामुळे आम्हाला एकमेकांप्रति आदर वाटतो. ही मला आमच्या दोघांमधील आवडणारी गोष्ट आहे. त्याच्याबरोबर पाच चित्रपटांत काम करताना मजा आली, असे मुकेश ऋषी यांनी म्हटले आहे.” ‘जुडवा’ , ‘तुमको ना भूल पाएँगे’, ‘गर्व’, ‘बंधन’, ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या चित्रपटांत दोघांनी एकत्र काम केले आहे.

Rakul Preet Singh
“मला न सांगताच प्रभासच्या चित्रपटातून…”, अभिनेत्री रकुल प्रीत सिंगकडून दु:खद आठवण उघड; म्हणाली, “आपण भोळे…”
Malaika Arora father post mortem report
मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचे निधन कशामुळे झाले? शवविच्छेदन अहवालातून माहिती आली समोर
Malaika Arora Father Anil Mehta Funeral
मलायकाच्या वडिलांवर आज अंत्यसंस्कार; अरबाज खान, अर्जुन कपूरसह सैफ-करीना अंत्यदर्शनासाठी पोहोचले
Salman Khan
HIV पॉझिटिव्हची भूमिका साकारण्यासाठी संपूर्ण बॉलीवूडने दिलेला नकार; पण, सलमान खानने होकार देत घेतले होते ‘इतके’ मानधन
Dia Mirza
“स्वत:चे चित्रपट पाहताना लाज…”, अभिनेत्री दिया मिर्झाचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “स्त्रियांकडे बुद्धिमत्ता…”
Anil Mehta made last calls to Daughters Malaika Arora
“मी थकलोय…”, लेक मलायका अरोराला फोन करून आत्महत्येआधी काय म्हणाले होते अनिल मेहता? माहिती आली समोर
malaika arora funeral
मलायका अरोराच्या वडिलांवर मुंबईत होणार अंत्यसंस्कार, इमारतीवरून उडी घेत बुधवारी संपवलं आयुष्य
netizens praised Arjun kapoor for being with Malaika Arora
Video: वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराला अर्जुन कपूरने दिला धीर, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
malaika Arora post about father death
वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट; म्हणाली, “आमचे प्रिय बाबा…”

हेही वाचा: “मला बिग बॉसच्या ओटीटीच्या ट्रॉफीपेक्षा पैशांची…”, अभिनेता रणवीर शौरीचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे तर तो ‘टायगर ३’मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्याबरोबर मुख्य भूमिकेत दिसला होता. २०२३ सालच्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘टायगर ३’ने बॉक्स ऑफिसवर २५० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता बॉलीवूडचा भाईजान २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंकदर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून चाहते या चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहताना दिसत आहेत. हा अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपट असून २०२५ ला ईदच्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या अ‍ॅटली दिग्दर्शित चित्रपटातदेखील सलमान खान दिसण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

मुकेश ऋषी हे ‘साजन चले ससुराल’, ‘घटक’, ‘जुडवा’, ‘गुंडा’, ‘सरफरोश’, ‘सूर्यवंशम’, ‘खिलाडी ४२०’, ‘कोई मिल गया’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखले जातात. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिफोर यू डाय’ या चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.