ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी दिवंगत मधुबाला व दिलीप कुमार यांच्या नात्याबद्दल केलेलं विधान चर्चेत आहे. मधुबाला यांनी दिलीप कुमार यांच्याबरोबर ‘मुगल-ए-आझम’ या प्रसिद्ध चित्रपटात काम केलं होतं. त्यांची जोडी खूप लोकप्रिय होती. मधुबाला व दिलीप कुमार प्रेमात होते, पण त्यांनी लग्न केलं नाही. ते का वेगळे झाले याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. आता, मुमताज यांनी एका मुलाखतीत सांगितलं की मधुबालांना बाळाला देऊ शकणार नव्हत्या, त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं.

पत्रकार विकी लालवानीशी बोलताना मुमताज म्हणाल्या, “मधुबालाने त्यांच्याशी नातं तोडलं नव्हतं. तिला मूल होऊ शकणार नव्हते, त्यामुळे त्यांनी (दिलीप कुमार) तिच्याशी संबंध तोडले. मग त्यांनी सायरा बानूशी लग्न केलं. सायरा खूप चांगली आहे, तिने दिलीप कुमार यांची शेवटच्या श्वासापर्यंत खूप काळजी घेतली. सायरा सुरुवातीला त्याची चाहती होती. त्यांच्या वयात खूप अंतर होतं, पण जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा या गोष्टी महत्त्वाच्या नसतात.”

दिलीप कुमार यांच्या प्रेमात वेडी होती मधुबाला

मुमताज पुढे म्हणाल्या, “मधुबाला दिलीप कुमार यांच्या प्रेमात वेडी होती, यात शंकाच नाही. पण दिलीप कुमार यांना मूल हवं होतं. कदाचित मूल व्हावं, यासाठीच त्यांनी सायराशी लग्न केलं. मधुबालाने स्वतः हे सगळं मला सांगितलं. मी तिला भेटायला जायचे, तिची प्रकृती अजिबात बरी नव्हती. ती म्हणायची, ‘जर मी माझ्या आयुष्यात कधी कोणावर प्रेम केलं असेल तर तो युसूफ होता. पण जेव्हा त्याला कळाले की मी गरोदर राहू शकत नाही…’ मधुबाला त्यांना युसूफ म्हणायची. डॉक्टरांनी मधुबालाला सांगितलं होतं की तिला हृदयविकार असल्याने बाळंतपणात तिचा मृत्यू होईल.”

दिलीप कुमार यांना दोष देत नाही – मुमताज

दिलीप कुमार यांनी जे केलं, त्यासाठी आपण त्यांना दोष देत नाही, कारण प्रत्येक पुरूषाला मूल हवं असतं; असं मुमताज म्हणाल्या. “तिच्यावर प्रेम असूनही, त्यांनी विचार केला असेल, ‘मला दुसऱ्या महिलेबरोबर बाळाचा प्रयत्न करू दे’. पण सायराबरोबरही मूल झालं नाही हे खूप दुःखद आहे,” असं वक्तव्य मुमताज यांनी केलं. सायराची दया येते, ती खूप चांगली आहे. जर त्यांना मूल झालं असतं तर आज तिची काळजी घेणारंही कोणीतरी असतं, असंही मुमताज म्हणाल असते तर तिचीही काळजी घेतली गेली असती.”

लग्नानंतर जेव्हा मधुबालाला भेटलेले दिलीप कुमार

मधुबाला व दिलीप कुमार जवळजवळ एक दशक एकत्र होते. त्यांनी ‘तराना’, ‘अमर’ आणि ‘संगदिल’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. सायरा बानूशी लग्न केल्यानंतर ते एकदा मधुबालाला भेटले होते. “आमच्या लग्नानंतर आम्ही मद्रासमध्ये राहत होतो. मला मधुबालाकडून एक मेसेज आला की तिला मला भेटायचंय, मुंबईला आल्यावर मी सायराला याबद्दल सांगितलं. त्यानंतर सायराने लगेच आग्रह धरला की मी मधुला भेटावं आणि मी तिला भेटलो,” असं दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुबालाने नंतर किशोर कुमारशी लग्न केलं, पण ते नातंही संपलं. १९६९ साली वयाच्या ३६ व्या वर्षी मधुबालाचं निधन झालं. तर दिलीप कुमार यांचे निधन ९८ व्या वर्षी २०२१ मध्ये झाले.