Munjya Box Office Collection: आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरू आहे. ७ जूनला प्रदर्शित झालेला ‘मुंज्या’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकजण चित्रपटाचं आणि त्यातील कलाकार मंडळींचं कौतुक करत आहेत. कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ असो किंवा राजकुमार राव व जान्हवी कपूरचा ‘मिस्टर अँड मिसेज माही’ असो या सगळ्या चित्रपटांना जोरदार टक्कर देऊन ‘मुंज्या’ चित्रपट बक्कळ कमाई करताना दिसत आहे. १०० कोटींच्या दिशेने ‘मुंज्या’ची जोरदार घोडदौड सुरू आहे.

‘मुंज्या’ चित्रपटात अभिनेत्री शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. याशिवाय बरेच मराठी कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळाले. हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४.२१ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ होताना दिसली. १० दिवसांत चित्रपटाने ५५ कोटींचा आकडा ओलांडला. तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा ‘मुंज्या’ला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा – Video: जुई गडकरीनं काकांबरोबर गायलं किशोर कुमार व आशा भोसलेंचं लोकप्रिय गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरल

काल, प्रदर्शनाच्या तिसऱ्या शनिवारी आदित्य सरपोतदारच्या ‘मुंज्या’ चित्रपटाने ५.८० कोटी कमावले. त्याआधी ३.३१ कोटींची कमाई केली होती. आतापर्यंत ‘मुंज्या’ चित्रपटाने १६ दिवसांत एकूण ८०.११ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आता लवकरच हा हॉरर कॉमेडी चित्रपट १०० कोटींचाही आकडा ओलांडणार आहे.

हेही वाचा – अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांच्या मोठ्या लेकाचं झालं निधन, अभिनेते म्हणाले, “मी त्याच्या इतका तिरस्कार…”

हेही वाचा – रस्त्यावर वडापाव विकून चंद्रिका दीक्षित एका दिवसाला कमावते ‘इतके’ पैसे, आकडा वाचून व्हाल थक्क

दरम्यान, कोकणात प्रचलित असलेल्या मुंज्याच्या दंतकथेचा आधार घेत या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. कोकणात चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.  ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लिजेंड ऑफ मुंज्याभोवती फिरतो. या हिंदी चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे मराठी कलाकार झळकले आहेत.