Munjya box office collection day 3: सध्या ‘मुंज्या’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. शुक्रवारी (७ जून रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या दिग्दर्शकाने केलं असून यात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोना सिंग, शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मुंज्या’ हा भयपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लिजेंड ऑफ मुंज्याभोवती फिरतो. भारतीय लोककथांवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाने दमदार ओपनिंग केली. यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी करणार लग्न, तारीख ठरली

‘मुंज्या’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ४ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये ८१.२५ टक्क्यांनी वाढ झाली असून त्याने ७.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी झालेल्या कमाईचे आकडे आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या, सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता ‘मुंज्या’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन १९ कोटींवर पोहोचले आहे.

…म्हणून १२८ मिलियन व्ह्यूज असलेलं ‘बदो बदी’ गाणं युट्यूबने केलं डिलीट, पाकिस्तानी गायकाला कोसळलं रडू

‘मुंज्या’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. बजेटच्या निम्म्याहून जास्त कमाई या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत केली आहे. बॉक्स ऑफिसवर अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने १९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला तर एक आठवडा पूर्ण होण्याआधीच तो बजेटची रक्कम वसूल करू शकतो, असं दिसत आहे.

मुंबई सोडून कुटुंबासह विदेशात स्थायिक झालीये मराठमोळी अभिनेत्री; कारण सांगत म्हणाली, “मला कामाच्या ऑफर…”

कोकणात प्रचलित असलेल्या मुंज्याच्या दंतकथेचा आधार घेत चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. कोकणात चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात सुहास जोशी, मोना सिंह, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहेत. आता सध्या तरी चित्रपटगृहांमध्ये दुसरा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने ‘मुंज्या’ला त्याचा फायदा होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munjya box office collection day 3 sharvari wagh movie hrc
Show comments