आज शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे याच चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. ‘जवान’ची इतकी तुफान क्रेझ आहे की नागपूर पोलिसांनाही त्याची भुरळ पडल्याचं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे नागपूर पोलिसांनी केलेलं ट्वीट होय.

कसा आहे शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत ‘जवान’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले…

Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan Said I choose wrong group
“माझा ग्रुप चुकला”, ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर वैभव चव्हाणने मान्य केली स्वतःची चूक, म्हणाला, “मी तळ्यात मळ्यात…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “शिखांना पगडी व कडं परिधान करण्याची…”, राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपाचा संताप; म्हणाले, “काँग्रेसने कत्तली घडवून…”
Brijbhushan Sharan Singh
Brijbhushan Sharan Singh : ब्रिजभूषण शरण सिंहांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले, “माझ्याविरुद्ध…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
adhir ranjan chowdhury mamata banerjee
Kolkata Rape Murder : “कोलकाता हत्याकांडातील पीडितेचं कुटुंब नजरकैदेत”, काँग्रेसचे ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावर ताशेरे
chinchpoklicha chintamani aagman sohala 2024 chintamani aagman sohala date and time Senior Police Inspector dadar appeal to ganeshbhakt
VIDEO: गणेशभक्तांनो चिंतामणीच्या आगमनाला जाताय? थांबा! आधी दादरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केलेलं आवाहन पाहा
rahul gandhi marriage kashmiri girl discussion
Rahul Gandhi Marriage: “तुम्ही लग्न करणार आहात का?” राहुल गांधींना काश्मिरी युवतींनी प्रश्न विचारताच म्हणाले…

नागपूर शहर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे पोस्टर आहे ज्यामध्ये शाहरुख खान तो चित्रपटात साकारत असलेल्या ५ वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहे. ‘वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड सेट करणं असं असतं,’ असं त्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे.

Video: ‘जवान’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ; तिकीट खरेदीसाठी रात्री २ वाजता चित्रपटगृहाबाहेर गर्दी, पाहा व्हिडीओ

या पोस्टरबरोबर नागपूर शहर पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “जेव्हा तुम्ही असे पासवर्ड ठेवता, तेव्हा एकही कोणताही फ्रॉडस्टर टिकू शकत नाही.” नागपूर पोलिसांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. जवानची क्रेझ पाहता नागपूर पोलिसांनी शक्कल लढविली आणि त्याद्वारेच सायबर क्राइमविरोधात जनजागृती केली आहे.

नागपूर पोलिसांच्या या ट्वीटवर युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘खूप चांगलं ट्वीट’, ‘नागपूर पोलिसांबद्दल आदर आहे’, ‘नागपूर पोलिसांनी सायबर सुरक्षिततेबद्दल केलेला मेसेज फार चांगला आहे’, अशा कमेंट्स युजर्स यावर करत आहेत.