Malhar Patekar said Baba to Nana Patekar Emotional Video Viral: नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाना पाटेकरांचं हार्ट अटॅकने गोव्यात निधन झालं, त्यानंतर रात्री उशिरा त्यांचं पार्थिव डोणजे येथील फार्महाऊसवर आणण्यात आलं. तिथेच गावकरी, राजकीय नेते, त्यांचे चाहते आणि कुटुंबियांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

नाना पाटेकरांच्या पार्थिवाला पत्नी निलकांती व मुलगा मल्हारने खांदा दिला. त्यानंतर मल्हारने त्यांना मुखाग्नी दिला. वडिलांच्या पार्थिवाजवळ उभा असलेल्या मल्हारला भावना अनावर झाल्या. छातीवर हात ठेवत त्याने आकाशाकडे पाहत जोरात ‘बाबा’ अशी हाक मारली. मल्हारला पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. इन्स्टंट बॉलीवूडने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा मल्हारचा भावुक व्हिडीओ

नाना पाटेकरांना मुखाग्नी दिल्यावर मल्हार रडू लागला. वडिलांच्या चितेसमोर हात जोडत त्याने आपले अश्रू पुसले आणि पुढे दंडवत घालून डोकं टेकवलं. मल्हारचे हे भावुक करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मल्हारचा वडिलांना शेवटचा दंडवत

दरम्यान, वडिलांच्या इच्छेप्रमाणेच नाम फाउंडेशन व निर्मला गजानन फाउंडेशनचं काम सुरू ठेवणार असल्याचं मल्हारने सांगितलं. या फाउंडेशनच्या जबाबदाऱ्या आणि सगळी कामं आधीच त्यांनी पुढच्या पिढीकडे सोपवली होती, असंही मल्हारने नमूद केलं. “माझ्यासाठी नानासाहेब इथेच आहेत. मी जर मान्य केलं की नानासाहेब गेलेत, तर मी संपेन त्यामुळे माझ्यासाठी नानासाहेब अजूनही आहेत, ते कुठेही जात नसतात. त्यांचं कर्तृत्वच असं आहे की ते अजरामर आहेत,” असंही मल्हार पाटेकर म्हणाला.