Nana Patekar Manisha Koirala : नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर रोजी) गोव्यातील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, चाहते आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या दमदार अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या नानांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. नाना पाटेकर त्यांच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. खासकरून मनीषा कोइरालाबरोबरच्या त्यांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. मनीषाने नानांबद्दल बोलणं कायम टाळलं, पण नाना बरेचदा तिच्याबद्दल बोलले होते.

नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी ‘खामोशी’ आणि ‘अग्नी साक्षी’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ‘युग पुरुष’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते. ब्रेकअपनंतरही दोघांनी सार्वजनिकरीत्या एकमेकांवर कधीही चिखलफेक केली नाही. मनीषाने तिच्या ‘Healed’ या आत्मचरित्रात कठीण काळातील दारूच्या व्यसनाबद्दल खुलासा केला होता. त्यावेळी नानांनी तिचे नाव न घेता, “तिची ही अवस्था पाहून माझे डोळे भरून येतात,” असे भावुक वक्तव्य केले होते.

मला मनीषाची आठवण येते – नाना पाटेकर

१९९७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर मनीषा कोईलाराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना प्रचंड भावुक झाले होते. “हा एक अत्यंत कठीण काळ आहे. ती वेदना अनुभवल्याशिवाय समजत नाही. मी सहन केलेल्या वेदना सांगण्यासाठी मला शब्दच सापडत नाहीयेत. प्लीज यावर आपण नको बोलायला. मला मनीषाची आठवण येते,” असं नाना पाटेकर म्हणाले होते.

nana patekar manisha koirala affair
मनीषा कोईराला व नाना पाटेकर (फोटो- इंडियन एक्सप्रेस आर्काइव्ह)

नानांनी केलेलं मनीषाचं कौतुक

ब्रेकअप झाल्यानंतरही नाना किंवा मनीषाने त्याबद्दल सार्वजनिकपणे भाष्य केले नाही, एकमेकांबद्दलही ते नेहमी चांगलंच बोलायचे. “मनीषाकडे जन्मतःच टॅलेंट आहे. ती सर्वात संवेदनशील अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका कस्तुरी हरणासारखी आहे. पण तिला कोणाशी स्पर्धा करण्याची गरज नाही, हे तिला अजून समजलेलं नाही. बाकी तिच्याकडे सगळं आहे आणि ते पुरेसं आहे,” असं नाना पाटेकर म्हणाले होते.

मनीषा कोईरालाचं दारूचं व्यसन आणि नानांचं वक्तव्य

मनीषाही त्या काळात कठीण टप्प्यातून गेली होती. तिने आपल्या ‘Healed’ या आत्मचरित्रात दारूच्या व्यसनाबद्दल लिहिलं होतं. “शूटिंगचा ताण विसरण्यासाठी, शांत राहण्यासाठी मी दारू पिऊ लागले होते. डाएटमध्ये मी फक्त व्होडका प्यायचे,” असं ती म्हणाली होती. मनीषा या कठीण काळातून जात असताना नानांनी तिचं नाव न घेता केलेलं वक्तव्य खूप गाजलं होतं. “तिने स्वतःची काय अवस्था करून घेतलीये हे पाहून माझे डोळे भरून येतात, मी स्वतःला जेमतेम सावरतोय. पण कदाचित आज मला तिच्याबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही,” असं ते म्हणाले होते.

दरम्यान, नाना पाटेकरांच्या निधनानंतर मनीषाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. “एक महान अभिनेता आणि कला क्षेत्रातील दिग्गजाच्या निधनाने मला खूप दुःख झालं आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान आणि आपल्या कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती,” असं मनीषा कोईराला नानांबद्दल म्हणाली.