Nana Patekar Madhuri Dixit Wajood Shayari : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी १९८९ मध्ये आलेल्या ‘वजूद’ या गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील ‘मल्हार’चे ‘अपूर्वा’वरील वेडे अन् एकतर्फी प्रेम आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.

चित्रपटात नाना पाटेकरांनी माधुरीसाठी म्हटलेली “कैसे बताऊँ मैं तुम्हें…” ही शायरी आजही रसिकांच्या ओठांवर आहे. ‘आप की अदालत’ या शोमध्ये नाना पाटेकरांनी ही शायरी पुन्हा सादर केवी होती. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत असून नाना पाटेकरांच्या खास शैलीतील या शायरीने नेटिझन्सना भुरळ घातली आहे.

‘आप की अदालत’ या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी ही शायरी म्हटली होती. त्या शायरीचे व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहेत. “वजूद चित्रपटात माझं माधुरी दीक्षितवर एकतर्फी प्रेम असतं. अर्थात तिच्या बाजूने तर प्रेम होणार नव्हतंच. पण माधुरीसाठी काहीतरी म्हटलं होतं, जे मी आजपर्यंत विसरलेलो नाही,” असं म्हणत नाना पाटेकर चित्रपटातील ती गाजलेली शायरी म्हणतात.

कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो,
कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो
जीवन का संगीत हो,
तुम जिंदगी
तुम बंदगी
तुम रोशनी
तुम ताजगी
तुम हर खुशी
प्यार हो
प्रीत हो
मनमीत हो
आंखों में तुम
यादों में तुम
नींदों में तुम
ख्वाबों में तुम हो
तुम हो मेरी हर बात में
तुम हो मेरे दिन रात में
तुम सुबह में
तुम शाम में
तुम सोच में
तुम काम में
मेरे लिए पाना भी तुम
मेरे लिए खोना भी तुम
मेरे लिए हंसना भी तुम
मेरे लिए रोना भी तुम
और जागना- सोना भी तुम
जाऊं कहीं, देखूं कहीं
तुम हो वहां
तुम हो वहीं
कैसे बताऊं मैं तुम्हें
तुम बिन तो मैं कुछ भी नहीं!

वजूदशिवाय, १९८७ साली आलेल्या मोहरे  या चित्रपटात नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित दोघेही होते. १९९१ सालच्या तसेच नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या अत्यंत गाजलेल्या चित्रपटात नानांनी मेजर चव्हाण यांची भूमिका साकारली होती. माधुरी दीक्षितने यात ‘शर्ली’ नावाची महत्त्वपूर्ण सहाय्यक भूमिका निभावली होती.