Nana Patekar Amitabh Bachchan 1 rupees Honorarium: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्य ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांच्या जाण्याने सिनेविश्वावर शोककळा पसरली असून कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नाना पाटेकर यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. नाना पाटेकर यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. यामध्ये आता नाना पाटेकर यांनी एकदा अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा एक रुपया जास्त मानधनाची मागणी केली होती.

अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर यांनी १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘कोहराम’ या सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन मेहुल कुमार यांनी केले होते. विशेष म्हणजे दोन्ही दिग्गज अभिनेत्यांनी या एकाच सिनेमात काम केले. यावेळी नाना पाटेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा १ रुपया अधिकचे मानधन मागितले होते. याबाबत दृश्यम ३ मधील गायतोंडे ही भूमिका साकारणारे कलमेश सावंत यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले कमलेश सावंत?

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत कमलेश यांनी नाना पाटेकर यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी एक अनोखी अट ठेवल्याचा एक किस्सा ऐकल्याचे कमलेश यांनी सांगितलं. कमलेश म्हणाले, “मी त्यांच्याबरोबर एका सिनेमात काम केले होते; पण दुर्दैवाने माझा त्यांच्याबरोबर एकही सीन नव्हता. पण, मी त्यांना सेटवर काम करताना पाहिलं आहे आणि त्यांचे अनेक किस्सेही ऐकले आहेत.

कलमेश पुढे म्हणाले, “एकदा मी असं ऐकलं होतं की, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सिनेमात काम करण्यासाठी नाना पाटेकर यांनी त्यांच्या मानधनापेक्षा एक रुपया जास्त मानधन मागितलं होतं. ते म्हणाले होते, ‘बच्चन साहेबांबरोबर काम करायचं असेल तर मी एक रुपया जास्त घेईन.’ त्यानंतर त्यांनी एका सिनेमासाठी एक कोटी रुपये आणि एक रुपया असं मानधन घेतलं, तर अमिताभ बच्चन यांना एक कोटी रुपये मिळाले होते. मी हा किस्सा ऐकला आहे; पण तो कितपत खरा आहे याबद्दल मला माहीत नाही.”

हीच नाना पाटेकर यांची ताकद – कमलेश

कमलेश यांनी नाना पाटेकर यांच्या विविधांगी अभिनयाबद्दल सांगितले. यावेळी कमलेश यांनी हिंदीमध्ये काम करताना योग्य पद्धतीने डायलॉग बोलण्यामध्ये नाना यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितलं. कमलेश म्हणाले, “एक काळ असा होता, जेव्हा बॉलीवूडमध्ये गाणी आणि नृत्य यांनाच सर्वाधिक महत्त्व दिलं जायचं. मात्र, हळूहळू डायलॉगवर लक्ष दिलं जाऊ लागलं. या बदलाची सुरुवात नाना पाटेकर यांनी केली. त्यांच्या प्रत्येक संवादाला प्रेक्षकांकडून टाळ्या मिळायच्या. गणेश टॉकीज आणि जय हिंद टॉकीजमध्ये त्यांच्या संवादांची असलेली क्रेझ मी स्वतः अनुभवली आहे. प्रेक्षक त्यांचे सिनेमे पुन्हा पुन्हा पाहायला जायचे. त्यांचे खास स्टाइलमधील संवाद ऐकून प्रेक्षक अक्षरशः वेडे व्हायचे, हीच नाना पाटेकर यांची ताकद होती.”