Nana Patekar passed away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यूने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. नाटक व सिनेमा या दोन्ही माध्यमांमध्ये प्रभावी अभिनय साकारणारे नाना पाटेकर यांना प्रचंड सामाजिक जाण होती. अभिनयाबरोबर समाजकार्यातूनही त्यांनी माणुसकी जपली. भरभरून आयुष्य जगणाऱ्या नाना पाटेकर यांनी मृत्यूचीही भीती वाटत नसल्याचे वक्तव्य केले होते.

‘अमुक तमुक’ला दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन मांडला होता. यावेळी नाना यांनी त्यांना कोणत्याही व्यक्तीची किंवा अगदी मृत्यूचीही भीती वाटत नसल्याचे सांगितले होते. नाना पाटेकर म्हणालेले, “मला कोणाचीच म्हणजे मृत्यूचीही भीती वाटत नाही. त्यामुळे मला कशाचीच भीती वाटत नाही. मला आता इथे चल म्हणाला, इथे बसता बसता असे पटकन आपण गेलो तरी मला ठीक आहे.”

व्यक्तीची भीती नाही तर… – नाना पाटेकर

पुढे नाना म्हणालेले, “मला भीती याची वाटते की, मला जे वाटते, ते मी इमानाने करतोय की नाही? माझ्या नकळत मी भ्रष्ट होतोय का? माझ्या हातातून काही अपलाप होतोय का? याची मला भीती वाटते.”

नाना म्हणालेले, “व्यक्तीची भीती मला नाही वाटत. खरे तर तुम्हीच तुम्हाला मोठे करायचे असते आणि तुम्हीच स्वतःला छोटे करत असता. फक्त तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून मी म्हणालो की, आपणच आपला आरसा झाल्यानंतर आयुष्य सोपे असते.”

पुढे ते म्हणालेले, “आमची खूप अशी मंडळी आहेत, ज्यांनी स्वतःचे आरसे फोडून टाकलेत आणि मग एक दिवस अचानकपणे कुठेतरी कोणीतरी आरसा दाखवल्यानंतर त्यात काहीतरी माकड दिसते. त्यानंतर ‘अरे माझे माकड कधी झाले?’ असे विचारतात. ‘मी असा नव्हतोच कधी, मी वेगळा होतो.’ तर मधल्या काळात तुझे जे कर्तृत्व होते ते असेच होते, त्यामुळे असे माकड झाले. असे आरसे आपल्यापाशी आहेत, ते दाखवले पाहिजेत. आपण ते आरसे माळ्यावर ठेवून दिलेत, ते काढा जरा.मग सगळे छान होईल.”