अनीस बज्मी दिग्दर्शित २००७ साली आलेला ‘वेलकम’ हा चित्रपट प्रेक्षकांना आजही खळखळून हसवतो. या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी उदय भाई व मजनू या भूमिका केल्या होत्या. त्यांच्या पात्रांचे व्हिडीओ व मीम इतक्या वर्षांनीही व्हायरल होत असतात. मागच्या वर्षी या फ्रेंचायझीचा तिसरा भाग ‘वेलकम टू द जंगल’ची घोषणा या दोन दिग्गज अभिनेत्यांशिवाय करण्यात आली. त्यामुळे प्रेक्षक निराश झाले होते, ते या चित्रपटात का नाहीत असे वारंवार विचारले जात होते. आता नाना पाटेकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘द लल्लनटॉप’ दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले, “जेव्हा मला उदय भाई या भूमिकेविषयी विचारले होते तेव्हा मी ती भूमिका करण्यास तयार नव्हतो. पण अनीस बज्मी यांनी उदय भाईला माझ्याशिवाय कोणीच न्याय देऊ शकणार नाही. ही भूमिका फक्त मीच करु शकतो, असे आपल्या आईची शपथ घेऊन सांगितले होते.” पुढे ते म्हणाले, “वेलकम हा चित्रपट मी आणि अनिल एकत्र असल्यामुळेच शक्य झाला. जर आमच्या दोघांपैकी एकजण या चित्रपटात असता तर त्याला ज्या प्रमाणात यश मिळाले ते नसते मिळाले. तसेच अनिलशिवाय हा चित्रपट होणे शक्य नव्हते.”

vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Vashu Bhagnani denies selling office space to pay debt
२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”
What Nana Patekar Said?
नाना पाटेकरांची आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच म्हणाले, “आजही…”
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
nana patekar talks about wife neelkanti patekar
“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…
Nana Patekar
“मी साधा, सभ्य काश्मिरी मुलगा होतो; पण नाना पाटेकरांमुळे…”, विधू विनोद चोप्रांचे वक्तव्य चर्चेत

हेही वाचा : ५८ वर्षांचा सलमान खान अजूनही अविवाहित का? त्याचे वडील सलीम खान म्हणाले, “तो सहज आकर्षित होतो, पण…”

२०१५ मध्ये आलेला ‘वेलकम बॅक’ हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर फार कमाई करु शकला नव्हता. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाविषयी बोलताना नाना म्हणाले, “अहमद खान दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटात काम करण्याबद्दल आम्हाला विचारण्यात आले होते. पण आम्ही चित्रपटात काम करण्यास नकार दिला. चित्रपटाची कथा एवढी चांगली नाही, त्यामुळे आम्हाला मजा आली नाही.”

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्याशिवाय अक्षय कुमार, कतरिना कैफ, मल्लिका शेरावत, परेश रावल, फिरोझ खान हे कलाकार देखील झळकले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. २०१५ मध्ये ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात अनिल कपूर आणि नाना पाटेकर त्याच भूमिकेत दिसून होते तर मुख्य भूमिकेत श्रुती हसन आणि जॉन अब्राहम होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करण्यात अयशस्वी ठरला.

हेही वाचा : २५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

दरम्यान, ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. कारण बॉलीवूडधील अनेक मोठे कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, राजपाल यादव, रवीना टंडन, लारा दत्ता, दिशा पटानी, परेश रावल, अर्शद वारसी, मिका सिंग, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, राहुल देव, शरीब हाश्मी, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, जॉनी लिव्हर आणि यशपाल शर्मा यात दिसणार आहेत. ख्रिसमसच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.

नाना पाटेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते आगामी काळात ‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या ‘जर्नी’ आणि प्रकाश झा यांच्या ‘लाल बत्ती’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.