Nana Patekar Manisha Koirala Relationship: ९० च्या दशकात ‘अग्नीसाक्षी’ आणि ‘खामोशी’ सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची जोडी खऱ्या आयुष्यातही प्रेमात पडली होती. मात्र, नानांचे विवाहित असणे आणि अभिनेत्री आयशा जुल्काबरोबर वाढलेली जवळीक यामुळे हे नातं संपुष्टात आलं. अनेक वर्षांनंतर नाना पाटेकरांनी मनीषाबद्दल भाष्य केलं होतं. तसेच त्यांनी मनीषाच्या ‘हीरामंडी’ सीरिजमधील अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले, मात्र तिच्याशी संपर्क का होऊ शकला नाही, असंही स्पष्ट केलं होतं.

मनीषा व नाना यांनी ‘अग्नीसाक्षी’, ‘युग पुरुष’, ‘खामोशी’ या चित्रपटांमध्ये एकत्र केलं होतं. १९९६ मध्ये ‘अग्नी साक्षी’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मनीषाचं विवेक मुशरनशी ब्रेकअप झालं होतं आणि ती नाना पाटेकरांच्या प्रेमात पडली होती. त्यावेळी नाना विवाहित होते, पण ते पत्नी नीलकांतीपासून वेगळे राहत होते.

मनीषा कोईराला नाना पाटेकरांबद्दल बोलणं टाळते. पण एकदा मनीषा कोईरालाबद्दल नाना पाटेकरांना विचारण्यात आलं होतं. तेव्हा नाना यांनी उत्तर दिलं होतं. नाना पाटेकर व मनीषाचं ब्रेकअप अभिनेत्री आयशा जुल्कामुळे झालं असं म्हटलं जातं. नाना पाटेकरांनी ‘द लल्लनटॉप’ ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नाना यांना एक्स गर्लफ्रेंड मनीषा कोईरालाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा ते काय म्हणाले होते? पाहुयात.

Award Banner

मनीषा कोईरालाबद्दल नाना पाटेकर काय म्हणाले होते?

नाना पाटेकरांना मुलाखतीत १० व्यक्तींबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. स्मिता पाटील, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान अशा दिग्गजांची नावं यात होती. यापैकीच एक नाव मनीषा कोईरालाचं होतं. तिचं नाव घेताच नाना काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. नाना यांनी मनीषाचं नाव ऐकून यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत होती.

मनीषाच्या ‘हीरामंडी’ सीरिजबद्दल नाना पाटेकरांचे वक्तव्य

“महान अभिनेत्री. तिला खूप कमी वयात कर्करोग झाला. तू ‘हीरामंडी’ पाहिलीस का? त्यात तिने खूप छान काम केलं आहे. मी तिची सीरिज पाहिली,” असं नाना पाटेकर म्हणाले होते. मनीषा कोईरालाने २०२४ मध्ये आलेल्या ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. तिच्या या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं होतं.

‘हीरामंडी’ पाहिल्यावर मनीषा कोईराला यांना शुभेच्छा दिल्या का? असं मुलाखतकाराने नाना पाटेकरांना विचारलं. त्यावर “नाही. कदाचित तिचा फोन नंबर आता तो नाही, बदलला आहे,” असं नाना म्हणाले होते.