O Romeo Cast Fees : बॉलीवूडमध्ये येत्या काळात अनेक सेलिब्रिटींचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकीच एक म्हणजे शाहिद कपूर. शाहिद कपूर सध्या त्याच्या ‘ओ रोमिओ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याच्यासह नाना पाटेकर, तमन्ना भाटिया यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत.
शाहिद कपूरच्या ‘ओ रोमिओ’मध्ये तृप्ती डिमरी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेतून झळकणार आहे. यामधून पहिल्यांदाच शाहिद व तृप्ती एकत्र काम करत आहेत, त्यामुळे या चित्रपटातील या फ्रेश जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. शाहिद व तृप्ती यांच्याबरोबर नाना पाटेकर, तमन्ना भाटिया, फरीदा जलाल यांसारखे इतरही काही कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटासाठी या सेलिब्रिटींनी किती मानधन घेतले आहे? ‘ओ रोमिओ’साठी कोणत्या सेलिब्रिटीने किती मानधन घेतलंय जाणून घेऊयात…
‘ओ रोमिओ’साठी शाहिद व तृप्तीने किती मानधन घेतलं?
विशाल भारद्वाज दिग्दर्शित शाहिद कपूर व तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ओ रोमिओ’ हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या शाहिदने ‘फ्री प्रेस जरनल’च्या वृत्तानुसार ४५ कोटी रुपये इतकं मानधन घेतलं आहे. तो या चित्रपटामध्ये उस्तारा हे पात्र साकारत आहे. शाहिद चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे, तर त्याच्यासह मुख्य भूमिकेत असलेल्या आणि चित्रपटात अफशा ही भूमिका साकारणाऱ्या तृप्ती डिमरीने उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृतानुसार ६ कोटी इतकं मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे.
तमन्ना व दिशाचं मानधन किती?
चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता अविनाश तिवारी यांने चित्रपटातील नायिका तृप्ती डिमरीपेक्षाही अधिक मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार अभिनेत्याने ७ कोटी इतकं मानधन घेतलं आहे; तर चित्रपटात रबिया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिनेसुद्धा ७कोटी इतकं मानधन घेतलं असल्याचं म्हटलं जातंय. तृप्ती व तमन्नासह ‘ओ रोमिओ’मध्ये अभिनेत्री दिशा पाटणीसुद्धा झळकणार आहे. ती यामध्ये डान्सरच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे, यासाठी तिने २कोटी रुपये इतकं मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय.
नाना पाटेकर यांनी घेतले ‘इतके’ कोटी
चित्रपटात नाना पाटेकरसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळणार आहेत. यामध्ये ते इस्माईल खान ही भूमिका साकारत असून उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार यासाठी त्यांनी ४ कोटी इतकं मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय. यासह ‘ओ रोमिओ’मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता विक्रांत मेस्सीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे. अद्याप विक्रांत मेस्सी व फरीदा जलाल यांनी किती मानधन घेतलं आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.
