ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी (८ ऑक्टोबर) रोजी निधन झालं. अभिनय क्षेत्रापलीकडे जाऊन त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि त्यांच्या रोखठोक पण हळव्या स्वभावासाठीही ओळखलं जातं. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत. अशातच बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचाही एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो नाना पाटेकरांबद्दल बोलताना आणि त्यांचं कौतुक करताना दिसत आहे.
नाना पाटेकरांना विकी कौशलची आई बांधायची राखी
विकी कौशल व नाना पाटेकर यांचे खूप जवळचे कौटुंबिक संबंध होते. नाना पाटेकरांना विकी कौशलची आई राखी बांधायची असं त्याने या व्हिडीओमधून सांगितलं आहे. नाना पाटेकरांच्या अकाली निधनानंतर विकी कौशल, त्याचा भाऊ सनी कौशल आणि त्यांचे वडील शाम कौशल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नानांबरोबरच्या आठवणी सांगत दु:ख व्यक्त केलं आहे. इन्स्टाग्रामवर सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये विकी नाना पाटेकरांद्दल “नाना काका आहेत त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळाले जे खूप खास होतं. आम्हाला दोघांना (विकी आणि त्याचा भाऊ) ते आमच्या लहानपणी हजाम म्हणायचे. ते आम्हाला आमच्या वडीलांप्रमाणे आहेत आणि आमचे त्यांच्याबरोबर खूप जुने संबंध आहेत. आई त्यांना राखी बांधते त्यामुळे ते इथे आहेत हे खरंच खूप खास आहे.” असं म्हणताना दिसत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नाना पाटेकर सनी कौशलच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला उपस्थि होते आणि ते शाम कौशल यांचे जवळचे मित्र होते त्याचसह त्यावेळी ते सनी व विकीचं कौतुक करत होते असं लिहिलं आहे. याच व्हिडीओमध्ये नाना पाटेकरही पुढे बोलताना दिसत आहेत. ते “एक लहान भाऊ चित्रपट बनवत आहे आणि माझा पुतण्या त्याचा नायक आहे. यापेक्षा अजून काही विशेष कारण असण्याची गरज नाही आणि लोकांना कोणता चित्रपट आवडेल हे आपण सांगू शकत नाही चांगले चांगले चित्रपट चालत नाही आणि नको ते चित्रपट चालतात.” असं म्हणताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये पुढे सनी कौशल नाना पाटेकरांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेताना आणि त्यांना मिठी मारताना दिसत आहे.
याच व्हिडीओमध्ये पुढे विकी व सनी कौशल यांचे वडील आणि अॅक्शन डायरेक्टर शाम कौशलही नाना पाटेकर यांचं कौतुक करताना दिसत आहेत. ते “नानाजी. मी त्यांना नेहमी भाऊ म्हणतो. ते मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. आमचं नातं खूप घट्ट आहे आणि तुम्हाला सांगतो जो माझा पहिला चित्रपट होता प्रहार त्यातही त्यांनीच मला संधी दिली होती आणि ते माझ्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आहेत यापेक्षा मोठी गोष्ट एक वडील म्हणून माझ्यासाठी कोणती असेल. वैयक्तिकरीत्यासुद्धा जेव्हा मी रुग्णालयात होतो आणि माझ्या जगण्याची खूप कमी शक्याता होती तेव्हा हे तिथे मला शुद्ध येईपर्यंत ऑपरेशन थिएटरमध्ये थांबले होते. त्यामुळे जर मी कोणामुळे जिवंत असेन तर ते नानामुळेच.”
नाना पाटेकर यांनी पुढे विकी पाच वर्षांचा असताना आणि सनी दोन-अडीच वर्षांचा असताना ते त्या दोघांना त्यांच्या अंगाखांद्यावर खेळवायचे त्यामुळे आज त्यांना मोठं झालेलं आणि काम करताना पाहून आनंद होतं आहे असं म्हटलं आहे. दरम्यान विकी कौशलची बायको अभिनेत्री कतरिना कैफनेही नाना पाटेकर यांच्या निधानंतर सोशल मीडियामार्फत दु:ख व्यक्त केलं. त्यामुळे एकूणच कौशल कुटुंबासाठी नाना पाटेकर खूप खास होते. अलीकडेच गणपतीत शाम कौशल नाना पाटेकरांना भेटले होते असं त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं पण ही त्यांची शेवटची भेट असेल याची त्यांना माहिती नव्हती असं म्हणत खंतही व्यक्त केली. तर सनीनेही त्यांचा ‘नटसम्राट’मधील फोटो शेअर करत भावाना व्यक्त करत दोघा भावांनी त्यांच्या नाना काकांची त्यांना खूप आठवण येईल असं सोशल मीडियामार्फत म्हटलं आहे.
