अभिनेता नसीरुद्दीन शहा गेली अनेक वर्ष त्यांच्या दमदार अभिनयाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या कामाचा नेहमीच कौतुक होत असतं. त्यांनी केलेल्या भूमिकांसाठी त्यांना आतापर्यंत अनेक मोठे मोठे पुरस्कारही मिळाले आहेत. पण आता त्यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचा वापर त्यांच्या मुंबई जवळील फार्महाऊसच्या दरवाजांची हँडल्स म्हणून केला आहे, अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. तर आता त्यांनी नुकतीच ‘लल्लनटॉप’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना हे खरं की खोटं असं विचारण्यात आलं. त्यावर नसीरुद्दीन शाह यांनी उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : अकबराबद्दल शिकवलेला इतिहास मूर्खपणाचा; नसीरुद्दीन शाहांचं स्पष्ट मत

ते म्हणाले, “हे खरं आहे. या पुरस्कारांची माझ्यालेखी काही किंमत नाही. मला जेव्हा पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा मी खूप खुश झालो होतो. पण नंतर मला एका मागोमाग एक धडाधड पुरस्कार मिळत गेले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे मिळालेले पुरस्कार मला माझ्या मेरिटसाठी मिळत नाहीयेत. तेव्हा मी ते सगळे पुरस्कार कुठेतरी ठेवून दिले. जेव्हा मला पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार मिळाले होते तेव्हा मला माझ्या वडिलांची खूप आठवण आली. तेव्हा ते या जगात नव्हते. त्यांना नेहमीच माझी काळजी असायची. पण स्पर्धा म्हणून दिले जाणारे पुरस्कार मला पटत नाहीत.”

हेही वाचा : “मी तो चित्रपट बघितलेला नाही आणि…” नसीरुद्दीन शाह ‘द केरला स्टोरी’बद्दल स्पष्टच बोलले

पुढे ते म्हणाले, “जो कलाकार जीव ओतून एखादी भूमिका साकारतो तोही त्या वर्षातील उत्तम कलाकारच असतो. त्यामुळे काही कलाकारांमधून एकाची निवड करायची आणि हाच सर्वोत्कृष्ट कलाकार आहे अशी घोषणा करणं चुकीचं आहे. त्यामुळे मला मिळालेल्या पुरस्कारांचा मला आनंद नाही. याचबरोबर मला शेवटचे जे दोन पुरस्कार मिळाले ते स्वीकारालाही मी गेलो नाही. मी फार्म हाऊस बनवलं तेव्हा मी असा विचार केला की मला मिळालेले पुरस्कार मी इथे वापरतो. त्यामुळे दोन्ही हातांनी जेव्हा दरवाजा उघडावा लागतो तेव्हा जो दरवाजा उघडेल त्याच्या हातात दोन-दोन फिल्मफेअर पुरस्कार असतील.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naseeruddin shah revealed why he made his farm house door handles using his trophies rnv
First published on: 04-06-2023 at 15:49 IST