अभिनेते नसीरुद्दीन शाह बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. ते त्यांच्या दमदार अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. नुकतंच त्यांनी धार्मिक द्वेष व कर्नाटकमध्ये मोदींनी प्रचार करूनही भाजपाचा पराभव झाला, त्याचा उल्लेख करत शाह यांनी टोला लगावला. “कलेच्या माध्यमातून प्रोपगंडा लोकांपर्यंत ज्या पद्धतीने पोहोचवला जात आहे, ते चिंताजनक आहे. मुस्लिमांविरुद्धच्या द्वेषाचा चतुराईने वापरला जात आहे आणि तीच आता फॅशन बनली आहे”, असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलंय.
हेही वाचा – “मुस्लिमांचा द्वेष ही फॅशनच…” नसीरुद्दीन शाह यांचं सत्ताधारी पक्षाबद्दल मोठं वक्तव्य
काही चित्रपट आणि शो हे चुकीची माहिती पसरवण्याचे आणि प्रोपगंडाचे साधन म्हणून वापरले जात आहेत, हे चिंताजनक आहे का? असं विचारलं असता शाह यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, वास्तवात काय घडत आहे याचे प्रतिबिंब पडद्यावर दिसते आहे. इस्लामोफोबियाचा वापर फक्त निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी केला जात आहे. “सध्याचा काळ खरंच चिंताजनक आहे. मुस्लीम द्वेष आजकाल अगदी सुशिक्षित लोकांमध्येही फॅशन बनला आहे. याचा सत्ताधारी पक्ष अतिशय हुशारीने वापर करत आहे. आम्ही धर्मनिरपेक्षता व लोकशाहीबद्दल बोलतो, मग तुम्ही प्रत्येक गोष्टीत धर्म का आणत आहात?,” असा सवाल शाह यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – “नकाब घालून जेवण करणं ही…”, इस्लामसाठी बॉलिवूड सोडणाऱ्या झायरा वसीमचं ट्वीट चर्चेत
“मतं मिळविण्यासाठी धर्माचा वापर करणार्या राजकारण्यांसाठी निवडणूक आयोग मूक प्रेक्षक बनला आहे. जर, एखाद्या मुस्लीम नेत्याने अल्लाहू अकबर म्हणत मतं मागितली असती तर किती मोठा गोंधळ झाला असता? पण, लोकांमध्ये फूट पाडणारे हे धर्माचे कार्ड एके दिवशी निघून जाईल अशी आशा आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी
हेही वाचा – आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; अभिनेत्रीच्या अंडरगारमेंटमध्ये आढळले स्पर्म
“आमचा निवडणूक आयोग इतका भेकड आहे की अशा परिस्थितीत एकही शब्द उच्चारण्याची हिंमत करत नाही. ‘मत देताना अल्लाहू अकबर बोलून बटण दाबा’ असं एखाद्या मुस्लीम नेत्याने म्हटलं असतं तर किती मोठा गोंधळ झाला असता. पण इथे आपले पंतप्रधान लोकांसमोर जाऊन अशा गोष्टी बोलतात आणि तरीही ते हरतात. त्यामुळे, मला आशा आहे की राजकारणात धर्माचा प्रभाव बंद होईल. पण सध्या तरी मुस्लीम द्वेष खूप सुरू आहे. हे या सरकारने हुशारीने खेळलेले एक कार्ड आहे, त्यामुळे ते अजून किती काळ टिकेल ते पाहुया” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.