ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या त्यांच्या ‘ताज – डिवाइडेड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. यामध्ये त्यांनी राजा अकबराची भूमिका साकारली आहे. ही वेब सीरीज मुघलांच्या राजवटीतील राजे आणि सम्राटांच्या कार्यपद्धती व वारसांवर आधारित आहे. याच पार्श्वभूमिवर नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांबदद्ल वक्तव्य केलं आहे. मुघलांचा अपमान करू नये, असं शाह यांनी म्हटलं आहे.

“तुम्हाला सुखरूप जाऊ दिलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “त्या दिवशी…”

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
abdul karim tunda acquitted in 1993 serial blasts case
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष मुक्त
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नसीरुद्दीन शाह यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, “ज्यांना माझ्या विचारांना विरोध करण्याची सवय आहे, त्यांना माझं म्हणणं कधीच समजणार नाही.” भारतात जे काही चुकीचं झालं ते मुघलांमुळे झालं, असं म्हटलं जातं. याकडे तुम्ही कसं पाहता, असं विचारलं असता शाह म्हणाले, “या गोष्टीचं मला खूप नवल वाटतं. खरं तर ते खूप हास्यास्पद आहे. म्हणजे, लोक अकबर आणि नादिर शाह किंवा बाबरचे पणजोबा तैमूर यांच्यातील फरक सांगू शकत नाहीत. खरं तर हे लोक इथे लुटायला आले होते, मुघल इथे लुटायला आले नव्हते. या देशाला ते आपलं घर बनवण्यासाठी इथे आले आणि त्यांनी तेच केले. त्यांचे योगदान कोणी नाकारू शकत नाही” असंही ते म्हणाले.

जावेद अख्तरांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर व्हिडीओ शेअर करणाऱ्या अली जफरवर संतापले पाकिस्तानी; अभिनेता म्हणाला, “दहशतवादामुळे आपण…”

शाह म्हणाले, “मुघल फक्त वाईटच होते, असा विचार करणे देशात इतिहासाची कमतरता दर्शवते. कदाचित भारताच्या स्वदेशी संस्कृतीच्या किमतीवर मुघलांचा गौरव करण्यासाठी इतिहासाची पुस्तकं खूप दयाळू होती, पण इतिहासातील त्यांचा काळ विनाशकारी होता, हेही नाकारता येत नाही. खरं तर यात नक्कीच ते एकटे नाहीत. दुर्दैवाने शाळेतील इतिहास हा बहुतेक मुघल किंवा ब्रिटिशांवर आधारित होता. आम्हाला लॉर्ड हार्डी, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि मुघल सम्राटांबद्दल माहिती होती, पण गुप्त घराण्याबद्दल किंवा मौर्य राजघराण्याबद्दल किंवा विजयनगर साम्राज्याबद्दल, अजिंठा लेण्यांचा इतिहास किंवा ईशान्येबद्दल माहिती नव्हती. आम्ही यापैकी कोणतीही गोष्ट वाचली नाही कारण इतिहास ब्रिटिशांनी किंवा अँग्लोफाईल्सनी लिहिला आहे आणि मला वाटतं की ते खरोखर चुकीचे आहे,” असं शाह म्हणाले.

“माझ्या नावाचा…” दोन बायका असलेल्या युट्यूबर अरमान मलिकवर संतापला गायक अरमान मलिक

शाह म्हणाले की, “जर मुघल साम्राज्य इतके वाईट होते तर त्याला विरोध करणारे त्यांनी बांधलेली स्मारकं का पाडत नाहीत. त्यांनी बांधलेली स्मारके. त्यांनी जे काही केलं ते वाईट असेल तर ताजमहाल पाडा, लाल किल्ला पाडा, कुतुबमिनार पाडा. लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानतो, तो तर मुघलांनी बांधला होता. आपल्याला त्याचा गौरव करण्याची गरज नाही आणि खरं तर आपल्याला त्याची बदनामी करण्याचीही गरज नाही,” असं नसीरुद्दीन शाह यावेळी बोलताना म्हणाले.