प्रसिद्ध पटकथा लेखक संजय चौहान यांचं १२ जानेवारी म्हणजेच काल संध्याकाळी मुंबईमध्ये निधन झाले. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संजय चौहान यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट ‘पान सिंग तोमर’ या चित्रपटाचे लेखन केले होते. त्याच बरोबरीने दिग्दर्शक तिगमांशू धुलिया यांच्याबरोबरीने साहेब बीवी और गँगस्टर चित्रपटासाठी लेखन केले होते.

संजय यांना लिव्हर सिरॉसिसचा त्रास होता, अंतर्गत झालेल्या रक्तस्त्रावामुळे ते बेशुद्ध होते, त्यांच्या पश्चात पत्नी सरिता आणि मुलगी सारा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज १३ जानेवारी रोजी दुपारी १२. ३० वाजता मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांना मुंबईतील रुग्णालयात १० दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

विश्लेषण : सिद्धार्थ-रश्मिकाचा ‘मिशन मजनू’ १९७१ च्या भारत पाक युद्धावर आधारित? जाणून घ्या

कोण होते संजय चौहान :

संजय चौहान यांचा जन्म भोपाळमध्ये झाला. दिल्लीत पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नंतर मुंबई गाठली. नव्व्दच्या दशकात त्यांनी भंवर ही गुन्हेगारी विश्वावरची मालिका लिहली होती. आय ऍम कलाम (२०११) या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला होता. मैने गांधी को नही मारा आणि धूप तसेच सुधीर मिश्रा यांच्या २००३ मध्ये आलेल्या ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ या चित्रपटासाठी त्यांनी संवादलेखन केले होते. चित्रपट निर्माते अविनाश दास यांनी इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली.