Marathi Actress Girja Oak : आपल्या सहज सुंदर अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून गिरिजा ओकला ओळखलं जातं. गेल्या काही महिन्यांपासून गिरिजा ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावारुपाला आली आहे. तिचे निळ्या साडीतले फोटो सर्वत्र तुफान व्हायरल झाले होते; यानंतर सर्वजण तिला ‘न्यू नॅशनल क्रश’ म्हणू लागले. आजवर गिरिजाने अनेक मालिका आणि मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर सुद्धा ती नेहमीच सक्रिय असते…. गिरिजाने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गिरिजाचा बदललेला आणि नवीन लूक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. आता अभिनेत्रीने तिच्या हेअरस्टाइलमध्ये बदल केला आहे. Curtain bangs हेअरकटमध्ये गिरिजा खूपच गोड दिसतेय. गिरिजाचा हा हटके लूक पाहून चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

“वॉव न्यू लूक”, “मिलियन डॉलर स्माइल”, “प्रिटी गर्ल”, “किती सुंदर दिसतेस”, “खूप सुंदर हेअरस्टाइल आहे”, “आमची हिरोईन”, “आमची लाडकी गिरिजा”, “एकीचीच हवा फक्त गिरिजा”, “खूप सुंदर लूक”, “गिरिजा वॉव छान दिसतेय” अशा असंख्य प्रतिक्रिया गिरिजाच्या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

गिरिजा आता कंगना रणौतच्या सिनेमात झळकणार…

कंगना रणौतने नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘भारत भाग्य विधाता’. या सिनेमात गिरिजा ओक सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं पोस्टर शेअर करत कंगनाने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.

या चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याची निर्मिती मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. हा चित्रपट १२ जूनला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात गिरिजाबरोबर हास्यजत्रा फेम लोकप्रिय मराठी अभिनेत्री ईशा डे सुद्धा झळकणार आहे. ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मनोज तापारिया यांनी केलं आहे. आता गिरिजा यामध्ये कोणती भूमिका साकारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.