आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर उत्तमोत्तम भूमिका साकारत नवाजुद्दीन सिद्दीकीने कलाक्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रेक्षकांचंही नवाजुद्दीनला भरभरुन प्रेम मिळालं. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचं खासगी आयुष्य बरंच चर्चेत आलं आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलिया सातत्याने त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे. शिवाय त्याच्यासह नवाजुद्दीनच्या कुटुंबियांवरही आलियाने छळ केल्याचा आरोप केला.

आणखी वाचा – एमसी स्टॅनच्या मुंबईमधील कॉन्सर्टला जमली हजारोंची गर्दी, एका तिकिटाची किंमत होती तब्बल…

Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
Vijaypat Singhania and his son Gautam Singhania
गौतम सिंघानिया आणि तुमच्यातला वाद मिटला?, विजयपत सिंघानिया म्हणाले, “इच्छा नसतानाही..”
siddhu moosewala house video goes viral after his brother birth
वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म; घरातील जल्लोषाचा VIDEO व्हायरल

नवाजुद्दीने या सगळ्या प्रकरणाबाबत आतापर्यंत मौन पाळलं होतं. अखेरीस त्याने सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. नवाजुद्दीन म्हणाला, “आतापर्यंत शांत राहीलो म्हणून मी वाईट माणूस आहे अशी माझ्यावर टीका करण्यात आली. हा तमाशा माझ्या मुलांना कधीतरी कळणारच या कारणामुळे मी शांत होता. सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं आणि काही लोकं माझ्या खराब प्रतिमेचा आनंद घेत आहेत”.

आणखी वाचा – “मी बाथरुममध्ये मुलांबरोबर…” आई श्रीदेवी यांचा उल्लेख करत जान्हवी कपूरने केलेला ‘तो’ खुलासा

“मी तुम्हा सगळ्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो. गेल्या काही वर्षांपासून मी व आलिया एकत्र राहत नाही. आमचा आधीच घटस्फोट झाला आहे. पण आम्ही मुलांसाठी समजुतदारीने वागलो”. पुढे तो म्हणाला, “माझी मुलं भारतात का आहेत? गेल्या ४५ दिवसांपासून शाळेमध्ये का गेली नाहीत? याचं उत्तर कोणी मला देईल का? मला माझ्या मुलांच्या शाळेमधून सतत पत्र येत आहे. तुमची मुलं शाळेत का येत नाहीत? अशी विचारणा होत आहे.”

आणखी वाचा – Amitabh Bachchan : हैदराबादमध्ये चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत, आता प्रकृती कशी? म्हणाले, “श्वास घेण्यासाठीही…”

शिवाय या व्यतिरिक्त आलियाबाबत नवाजुद्दीने भाष्य केलं आहे. प्रत्येक महिन्याला आलियाला १० लाख रुपये देत असल्याचं त्याने सांगितलं. त्याचबरोबरीने आलिया ते पैसे स्वतःसाठी खर्च करत असल्याचेही नवाजुद्दीने आरोप केले आहेत. नवाजुद्दीनची पत्नी त्याच्या दोन्ही मुलांसह दुबईमध्ये राहते. पण पत्नीसह दोन्ही मुलांचा खर्च नवाजुद्दीन करत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. इतकंच नव्हे तर माझी प्रतिमा खराब करण्यासाठी आलियाचे प्रयत्न सुरू आहेत असंही नवाजुद्दीनचं म्हणणं आहे. शिवाय या पोस्टद्वारे नवाजुद्दीने त्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंबाबतही भाष्य केलं आहे.