सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाजुद्दिन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना आपल्या अभिनयाच्या जोरावर नवाजने अल्पावधीतच अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. शाहरुखसोबत ‘रईस’, सलमान खानसोबत ‘बजरंगी भाईजान’, तर ‘तलाश’ चित्रपटात नवाजुद्दिनने आमिर खानसोबत काम केले आहे.

नवाजुद्दिन त्याच्या प्रत्येक पात्रात जीव ओततो. अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक भूमिका केल्यानंतर आता त्याने मोठ्या भूमिका करायला सुरुवात केली आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेबाबत नवाजुद्दीन सिद्दिकीने मोठी घोषणा केली आहे. एवढंच नाही तर सलमान आणि शाहरुखबरोबर काम करण्याबाबतही नवाजुद्दीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

हेही वाचा- ““दूध पिताना ती…”; आलिया भट्टने सांगितली लाडकी लेक राहाची ‘ती’ सवय, म्हणाली, “आमच्या दोघींमध्ये…”

डीएनएशी संवाद साधताना नवाजुद्दीन सिद्दिकी म्हणाला, “असे नाही की मला सलमान किंवा शाहरुखसोबत काम करायचे नाही. जर मला मोठ्या चित्रपटात सशक्त भूमिका मिळाली, तर मी पूर्वीप्रमाणेच काम करायला तयार आहे. मात्र, चित्रपटात मुख्य भूमिका आणि साहाय्यक भूमिका यामधील अंतरही महत्त्वाचे आहे. युरोप किंवा हॉलीवूडमध्ये यावरून काही फरक पडत नाही, पण इथे साहाय्यक कलाकारांना छोट्या भूमिका मिळतात. मी कसा तरी त्यातून सुटलो आणि मला त्याची पुनरावृत्ती करायची नाही. आता मी फक्त मुख्य भूमिका करणार आहे. यासाठी मला स्वतःच्या खिशातून चित्रपटासाठी पैसे द्यावे लागले तरी चालेल.”

नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, त्याचा अर्थ असा नाही की तो फक्त आणि फक्त हिरोची भूमिका करेल. तो म्हणाला, ‘जसे मी ‘रईस’मध्ये काम केले होते. माझी भूमिका शाहरुख खानच्या विरुद्ध होती आणि ती एक दमदार भूमिका होती. मी ‘हिरोपंती-२’ केला, जरी तो चित्रपट चालला नाही, पण त्यात माझी मुख्य भूमिका होती. आता मला मोठ्या चित्रपटांमध्ये अशा भूमिका करायच्या आहेत.

हेही वाचा- “याकडे लक्ष देण्यापेक्षा मी…” भगवी बिकिनी ते ‘पद्मावत’ला झालेला विरोध; दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया

नवाजुद्दीन सिद्दिकी नुकताच ‘अफवा’ या चित्रपटात दिसला होता. आता तो ‘जोगिरा सा रा रा रा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्याबरोबर नेहा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. संजय मिश्रा, महाक्षय चक्रवर्ती आणि झरीना वहाब हे देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. हा चित्रपट १२ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.