‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाजुद्दिन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना आपल्या अभिनयाच्या जोरावर नवाजने अल्पावधीतच अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. शाहरुखसोबत ‘रईस’, सलमान खानसोबत ‘बजरंगी भाईजान’, तर ‘तलाश’ चित्रपटात नवाजुद्दिनने आमिर खानसोबत काम केले आहे.

हेही वाचा : Artificial Intelligence ‘शाप की वरदान?’ ए. आर. रेहमान चिंता व्यक्त करीत म्हणाले, “मला नव्या पिढीची…”

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

नवाजुद्दिन सिद्दिकीने अलीकडेच ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचा बड्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अफवाह’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल खुलासा केला आहे. ‘अफवाह’च्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल बोलताना, नवाजुद्दिनने सांगितले, “चित्रपट बनवल्यावर निर्मात्यांनी तो धैर्याने रिलीज केला पाहिजे. बरेच लोक मला फोन करून विचारत आहेत की, हा चित्रपट कुठे रिलीज होतोय? त्यांना काय सांगू चित्रपट कुठे रिलीज होणार? इंडस्ट्रीतील लोकही मला तेच विचारत आहेत, त्यांना मी काहीही सांगू शकत नाही. आता या चित्रपटाचे चांगले कलेक्शन झाले नाही तर लोक म्हणतील नवाज फ्लॉप अभिनेता आहे. त्यापेक्षा निर्माते हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करू शकले असते.”

हेही वाचा : चाहत्याने भर कॉन्सर्टमध्ये खेचला अरिजित सिंहचा हात; गायक थरथरत म्हणाला,”प्लीज स्टेजवर…”

बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? याबद्दल विचारले असता नवाजुद्दीन म्हणाला, “बड्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव फारच मनोरंजक आहे. शाहरुख-सलमान असो किंवा आमिर… हे कलाकार जेव्हा त्यांच्याकडे चांगली वा तगडी स्क्रिप्ट असते तेव्हा मला फोन करतात. कारण, ते लोक मला आणि माझ्या कामाला ओळखतात. हे तिन्ही स्टार्स मला वैयक्तिकरीत्या ओळखतात, त्यामुळे माझे त्यांच्याशी असलेले नाते अतिशय घट्ट आहे. एवढे मोठे सुपरस्टार्स माझ्याशी इतक्या विनम्रपणे बोलत असतील, तर त्यांनी नक्कीच मला आपले मानले आहे.”

हेही वाचा : प्रार्थना बेहेरेने मानले जॅकी श्रॉफ यांचे आभार, कारण…

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘अफवाह’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला असून यामध्ये त्याच्यासोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. लवकरच नवाजुद्दीन हा नेहा शर्मासोबत ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटात दिसणार आहे.