scorecardresearch

नवाजुद्दीन म्हणतो ‘घटस्फोट झालाय’, पत्नी म्हणते ‘नाही झाला’, दोघेही मुलांच्या कस्टडीसाठी कोर्टात भिडणार

आलिया सिद्दीकी सध्या एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे, तेही तिला लवकरच रिकामं करण्यास सांगण्यात आलंय.

nawazuddin-siddiqui-divorce news
नवाजुद्दीन सिद्दीकी व आलिया सिद्दीकी

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यादरम्यान गेले काही दिवस सातत्याने वाद सुरू आहे. आलियाने सुरुवातीला केलेल्या आरोपावर उत्तर देताना नवाजुद्दीन सिद्दीकीने एक स्टेटमेंट जाहीर केलं होतं, त्यात त्याने तिच्यापासून घटस्फोट घेतल्याचं नमूद केलं होतं, पण आलिया मात्र आता घटस्फोट घेणार असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे या दोघांचा नक्की घटस्फोट झालाय की नाही, यातही संभ्रम आहे.

प्रियांका चोप्राने ३०व्या वर्षी केलेले Eggs Freeze; आता खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईने…”

रविवारी २६ मार्च रोजी नवाजुद्दीनने भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि आलियाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला व १०० कोटी रुपये आणि माफीची मागणी केली होती. याच्या दोन दिवसांनंतर आता आलिया सिद्दीकीने सांगितले की, अभिनेत्याने सेटलमेंटसाठी संपर्क साधला आहे पण आलियाने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात नवीन ट्वीस्ट; तीन दिवसानंतरही पोस्ट मॉर्टम रिपोर्ट गुलदस्त्यात, ‘त्या’ रात्री हॉटेलमध्ये आलेला तरुण…

आलियाने ‘इटाईम्स’ला सांगितले की, “घटस्फोट होईल, हे निश्चित आहे आणि मी माझ्या दोन्ही मुलांच्या कस्टडीसाठी लढणार आहे. नवाजने कस्टडीसाठी अर्जही दिला आहे पण मी हे होऊ देणार नाही. माझ्या दोन्ही मुलांना माझ्यासोबत राहायचे आहे, त्याच्यासोबत राहायचे नाही.” दरम्यान, आलियाने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात आपला छळ होत असल्याचा दावाही केला होता. नवाजुद्दीनच्या आईनेही आलियाविरोधात प्रॉपर्टीच्या वादात तक्रार दाखल केली होती. मार्चमध्ये, आलियाने दावा केला होता की तिला तिची मुलं शोरा आणि यानीसह रात्री उशिरा घराबाहेर हाकलण्यात आलं होतं.

“इथल्या राजकारणाला…” प्रियांका चोप्राचा हिंदी सिनेसृष्टीवर गंभीर आरोप

आलिया सिद्दीकी सध्या एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे, तेही तिला लवकरच रिकामं करण्यास सांगण्यात आलंय. “मला ३० मार्चपर्यंत अपार्टमेंट सोडण्यास सांगण्यात आलं होतं, पण मला राहण्यासाठी दुसरी जागा मिळत नसल्याने मी ही तारीख एक महिना वाढवण्याची विनंती केली आहे. नवाजुद्दीन बरोबरच्या वादामुळे सोसायटी मला राहण्यास घर भाड्याने देण्यास नकार देत आहे,” असा दावाही तिने केला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 09:52 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या