बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन व त्याच्या पत्नीमधील वादामुळे अनेक गोष्टी समोर येत आहेत. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. घटस्फोट घेण्याबरोबरच मुलांच्या कस्टडीसाठीही नवाजुद्दीन व आलिया कोर्टात कायदेशीर लढाई लढत आहेत.

आलिया मुलगी शोरा व लेक यानीसह सोमवारी(३ एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर दिसून आली. यावेळी तिने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार, नवाजुददीनची मुले त्याच्याकडे जाण्यासाठी तयार नसल्याचं आलियाने म्हटलं आहे. मुलांच्या कस्टडीबाबत प्रश्न विचारतच आलिया म्हणाली, “जन्मापासून मुले माझ्याकडेच आहेत. माझ्या मुलांना वडिलांकडे जायचं नाही”, असं ती म्हणाली.

obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
mithun chakraborty son namashi calls him mithun
मिथुन चक्रवर्तींना नावाने हाक मारतात त्यांची मुलं, कारण सांगत लेक नमाशी म्हणाला, “आम्ही वडिलांना…”
Rape on 11 year girl
पाचवीतल्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, दत्तक आई वडिलांचं क्रूर कृत्य

हेही वाचा>> कोण आहे शोभिता धुलिपाला? नागाचैतन्यला डेट करण्याआधी ‘या’ व्यक्तीबरोबर होतं अफेअर

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, “नवाजुद्दीन मुलांना भेटण्यासाठी यायचा पण त्याने कधीच त्यांना वेळ दिला नाही. वडिलांबरोबरचं नातं कसं असतं, हेच माझ्या मुलांना माहीत नाही. माझी मुलगी शोरा १३ वर्षांची आहे. माझ्या आणि नवाजुद्दीनच्या नात्याने कोणत्या प्रकारचं वळण घेतलं, हे तिला माहीत आहे. त्यामुळे वडिलांकडे जायचं म्हटल्यावर ती नाही म्हणते. दुसरीकडे, यानी माझ्या मुलाला नवाजुद्दीन त्याचे वडील असल्याचं माहीत आहे. पण त्याला वडिलाचं प्रेम कधीच मिळालं नाही”, असं आलिया म्हणाली.

हेही वाचा>> परिणीता चोप्रा-राघव चड्ढा यांची लगीनघाई! दिल्लीत सुरू आहे साखरपुड्याची जय्यत तयारी

पुढे आलिया म्हणाली, “गेल्या दहा महिन्यांपासून माझी मुलं नवाजुद्दीनला भेटलेली नाहीत. त्याला माझ्या मुलांना भेटायचं आहे. पण मुलं नेहमी नकार देतात. वडिलांना भेटू नका असं मी माझ्या मुलांना कधीही म्हटलेलं नाही.”