scorecardresearch

“माझी मुलगी मुस्लीम धर्माचे पालन करते” नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाची पोस्ट चर्चेत, म्हणाली “मी एक ब्राह्मण मुलगी…”

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाची पोस्ट चर्चेत

nawazuddin siddiqui wife news
नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाची पोस्ट चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्धीकीने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाजुद्दीन व आलियाने २००९ साली लग्न केलं होतं. त्यांना शोरा व यानी ही दोन मुले आहेत.

नवाजुद्दीनबरोबर लग्न केल्यानंतर आलियाने तिचं नाव बदललं होतं. नवाजुद्दीनशी लग्न करण्यापूर्वी आलियाचं नाव अंजना किशोर पांडे असं होतं. आता घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा नाव बदलणार असल्याचं तिने सांगितलं आहे. नवाजु्ददीन व आलियाची मोठी मुलगी शोराने पहिल्यांदाच रोजाचे उपवास केले आहेत. शोरासाठी आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्टही शेअर केली होती. आता आलियाने स्वत:चा फोटो शेअर करत तिच्या धर्माबाबत भाष्य केलं आहे.

हेही वाचा>>Akanksha Dubey Suicide: आकांक्षा दुबे आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेंड समर सिंहविरोधात गुन्हा दाखल, अभिनेत्रीच्या कुटुंबाने केलेले गंभीर आरोप

हेही वाचा>> “सैराटआधी मी एकदम साधा राहायचो” आकाश ठोसरचं वक्तव्य, म्हणाला “मी एकादशीला…”

काय म्हणाली आलिया सिद्दीकी?

माझी मुलगी शोरा रोजाचे उपवास करत आहे. ती मुस्लीम धर्माचं पालन करते. शोराने या धर्माचा स्वीकार केला आहे आणि तिच्या या निर्णयाचा मी आयुष्यभर आदर करेन.
मी ब्राह्मण मुलगी असून परमात्म्यावर माझा विश्वास आहे. मी शंकराची भक्त आहे आणि आयुष्यभर शिवभक्तच राहीन.
माझ्या नावाबाबत बोलायचं झालं तर, लग्नानंतर मी अंजना किशोर पांडे हे नाव बदलून आलिया सिद्दीकी असं केलं. पण मी नेहमी शंकराची पूजा केली आणि शंकरावर माझी श्रद्धा आहे.
धर्मभेद करण्यावर माझा विश्वास नाही. कोणत्या धर्माचं पालन करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुठला धर्म स्वीकारायचा हा प्रत्येकाला अधिकार आहे.
राहिला प्रश्न माझ्या नावाचा तर मी सांगू इच्छिते, कायदेशीर घटस्फोट झाल्यानंतर मी पुन्हा आलिया सिद्दीकी हे नाव बदलून अंजना किशोर पांडे असं करणार आहे. याचा प्रत्येकाने आदर करावा अशी माझी अपेक्षा आहे.

हेही वाचा>> २०व्या वर्षी केसगळतीमुळे अक्षय खन्नाने करिअरमधून घेतलेला ब्रेक; स्वत:च केलेला खुलासा, म्हणाला “टक्कल पडल्यामुळे…”

दरम्यान, आलियाने नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले होते. मारहाण करण्याबरोबरच पैसा व प्रसिद्धीचा गैरवापर केल्याचा आरोप आलियाने अभिनेत्यावर केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 14:30 IST

संबंधित बातम्या