ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांची आज (७ ऑक्टोबर) प्राणज्योत मालवली. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांनी चित्रपट आणि मालिका अशा दोन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. १९९१ मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘चाणक्य’ या मालिकेमधील त्यांची राजा पोरस ही भूमिका फार गाजली होती. त्यांनी ‘सत्या’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘3 इडियट्स’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘पीके’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. आज प्रदर्शित झालेला ‘गुडबाय’ हा त्यांच्या कारकीर्दीतला शेवटचा चित्रपट आहे.

अरुण बाली यांच्या निधनावर मनोरंजन विश्वामधील अनेक दिग्गज शोक व्यक्त करत आहेत. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या सहकलाकाराला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या अरुण यांच्या शेजारी बसल्या आहेत. अरुण यांनी एका साधूप्रमाणे वेष परिधान केला आहे. त्यांनी भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करत त्यावर ऊँ नमः शिवाय असे लिहिलेला पिवळ्या रंगाचा कपडा पसरवला आहे. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षची माळ आहे. त्यांच्या बाजूला लाल-तपकिरी रंग असलेली साडी नेसलेल्या नीना गुप्ता बसलेल्या आहेत.

आणखी वाचा – अग्निशमन दलाच्या आव्हानांवर बेतलेल्या ‘या’ चित्रपटात प्रतीक गांधीसह झळकणार जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर</strong>

नीना यांनी शेअर केलेला हा फोटो ‘परंपरा’ या मालिकेच्या सेटवरचा आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी “अलविदा अरुण बाली. बऱ्याच वर्षांपूर्वीचा ‘परंपरा’ मालिकेच्या सेटवर पहिल्या दिवशी अरुण बाली यांच्यासह काढलेला हा फोटो. तुमच्याबरोबर ‘गुडबाय’ चित्रपटामध्ये काम करायची संधी मिळाली याचा आनंद आहे”, असे म्हटले. या फोटोखाली कमेंट करत अनेक चाहत्यांनीही त्यांना आदरांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – ना प्रभास, ना सैफ, ‘आदिपुरुष’ टीझरनंतर ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं होतंय कौतुक; काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, रश्मिका मंदाना यांच्या ‘गुडबाय’ या चित्रपटामध्ये ते शेवटचे दिसले होते. त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा गंभीर आजार झाला होता. या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखलही करण्यात आले होते. आज मुंबईमध्ये पहाटे ४.३० वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.