बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता सतत चर्चेत असतात. नीना गुप्ता त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. नीना गुप्ता आणि दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांना माहिती आहे. विवियनबरोबर नात्यात येण्याअगोदर नीना गुप्तांनी दुसऱ्या एका पुरुषाशी लग्न केले होते. आणि लग्न करण्यामागचे कारणही खूप रंजक होते. हेही वाचा- “फक्त दोन चमचे आणि एक ताट…” लग्नानंतर मीरा घरी आल्यावर अशी होती शाहिद कपूरच्या घराची अवस्था नीना गुप्तांनी २००८ मध्ये विवेक मेहरांबरोबर लग्न केले. मात्र, नीना गुप्तांनी विवेक यांच्याशी लग्न करण्याअगोदर दुसऱ्या व्यक्तीशी लग्नगाठ बांधली होती. आपली बायोग्राफी 'सच कहूं तो' मध्ये खुद्द नीना गुप्तांनी याबाबतचा खुलासा केला आहे. विवेक त्यांचे पहिले पती नाहीत. याआधीही त्या अनेक रिलेशनशिपमध्ये राहिल्या असल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. माझे अनेक लोकांशी अफेअर होते, अशी कबूलीही त्यांनी दिली आहे. विवियन रिचर्ड्सबरोबर नात्यात येण्याअगोदर नीना गुप्ता अमलन कुसुम घोष नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात होत्या. त्या दोघांनी लग्नही केले होते. मात्र, नीना गुप्ता यांनी अमलनबरोबर लग्न करण्यामागे वेगळे कारण होते. नीना गुप्ता यांना लग्नाशिवाय काश्मीरला जायचे होते. मात्र घरच्यांनी हे मान्य केले नाही. अशा परिस्थितीत नीना गुप्ता यांनी घाईघाईत अमलनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून त्यांना काश्मीरला जाता येईल. मात्र, लग्नानंतर त्यांचे नाते एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकू शकले नाही आणि ते वेगळे झाले. हेही वाचा- Video : “छोटा भाई है मेरा”, सारा अली खानचे भावावर आहे जीवापाड प्रेम; दोघांचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले पहिलं लग्न मोडल्यानंतर नीना गुप्ता क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सच्या प्रेमात पडल्या. नीना गुप्तांनी आपल्या बायोग्राफीत विवियनबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. त्यांची पहिली भेट जयपूरमध्ये झाली. त्या जयपूरमध्ये 'बंटवारा' चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. एके दिवशी त्या जयपूरच्या महाराणीने आयोजित केलेल्या पार्टीत गेल्या होत्या. त्या पार्टीत वेस्ट इंडिजचा तत्कालीन कर्णधार विवियन रिचर्ड्सही आपल्या संघासह सहभागी झाला होता. त्या वेळेस नीना गुप्ता आणि विवियनमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, काही काळानंतर दोघे वेगळे झाले. नीना आणि विवयन यांनी कधीच लग्न केलं नाही. मात्र, दोघांना मसाबा नावाची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच मसाबाने आपल्या प्रियकराबरोबर लग्नगाठ बांधली आहे.