Neena Gupta says she was blindly love with Viv Richards not listen to parents | Loksatta

“मी गरोदर असल्याचं कळताच पालकांनी…” नीना गुप्तांनी सांगितली जुनी आठवण

“मी प्रेमात आंधळी….” विवियन रिचर्ड्सशी असलेलं नातं अन् मुलीच्या जन्माबद्दल नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

“मी गरोदर असल्याचं कळताच पालकांनी…” नीना गुप्तांनी सांगितली जुनी आठवण
(फोटो – इन्स्टाग्राम)

अभिनेत्री नीना गुप्ता या सध्या त्यांच्या ‘उंचाई’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नीना या त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. नीना गुप्ता यांनी ९०च्या दशकात लग्न न करताच मुलगी मसाबाला जन्म दिला होता. त्यांनी एक पालक म्हणून मुलीला वाढवलं. त्या नेहमीच त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि मुलगी मसाबाला एकल पालक म्हणून वाढवण्याबद्दलही बोलतात. नीना गुप्ता या वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सबरोबर रिलेशनशीपमध्ये होत्या. तेव्हाच त्या गरोदर राहिल्या आणि त्यांनी लग्न न करताच मुलीला जन्म दिला होता.

ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी त्यांचं अफेअर, मुलीचा जन्म आणि पालकांची प्रतिक्रिया याबद्दल सांगितलं. यावेळी त्यांनी विवियनला गरोदरपणाबद्दल सांगायला फोन केला तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती, याबदद्लही आठवण सांगितली.

हेही वाचा – गरोदर असल्याचं कळताच नीना गुप्तांनी जेव्हा विवियन रिचर्ड्सला केला होता फोन, आठवण सांगत म्हणाल्या, “मी खूप…”

विवियनचं लग्न झालं होतं, पण तरीही त्याने मला बाळाला जन्म देण्यास सांगितलं, असं नीना म्हणाल्या. तसेच त्यांच्या कुटुंबाने मात्र त्यांच्या या निर्णयाला विरोध केला होता. मी या बाळाला जन्म देऊ नये, असं त्यांचं म्हणणं होतं. सुरुवातीला त्यांच्या निर्णयाला घरातील कुणीच पाठिंबा दिला नाही, परंतु शेवटी त्यांच्या वडिलांनी पाठिंबा दिला आणि मग कुटुंबातील इतरांनीही पाठिंबा दिला.

‘The Kashmir Files’च्या प्रदर्शनानंतर दिग्दर्शकाने बिग बींच्या शेजारी घेतलं आलिशान घर, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

नीना म्हणाल्या, “गरोदर असल्याचं कळल्यावर मला खूप आनंद झाला होता, असं नाही. मी आनंदी होते, कारण मी त्याच्यावर प्रेम केलं. मी त्याला फोन केला आणि विचारलं की तुला हे मूल नको असेल तर मलाही नकोय. मला हे मूल तुझ्यासाठी झाल्याचं आवडेल, असं त्याने मला सांगितलं. नंतर मी बाळाला जन्म देण्याचं ठरवलं. खरं तर सर्वांनी मला सांगितलं, की ‘बाळाला जन्म देऊ नकोस, तू एकटी सगळं कसं करू शकणार?’ पण जेव्हा तुम्ही तरुण असता ना तेव्हा तुम्ही प्रेमात आंधळे असता. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही कोणाचंही ऐकत नाही. कोणतीही मुलं त्यांच्या पालकांचं ऐकत नाहीत आणि मीही तशीच होते, मी देखील माझ्या पालकांचं ऐकलं नाही आणि बाळाला जन्म देण्याचं ठरवलं. सुरुवातीला घरात सर्वांनी खूप विरोध केला. नंतर मात्र माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला. त्यानंतर गोष्टी थोड्या बदलल्या.”

मुंबईत ई-बाईकवरून फेरफटका मारताना दिसला ‘हा’ अभिनेता; तुम्ही ओळखलंत का?

नीना आणि विवियन यांची पहिली भेट जयपूरमध्ये झाली. जयपूरच्या राणीने चित्रपटाच्या कलाकारांना आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला जेवायला बोलावलं होतं, तेव्हा त्यांची विवियनशी भेट झाली. दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर नीना गरोदर राहिल्या. त्यानंतर त्यांनी लग्न न करताच मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव मसाबा गुप्ता असून ती आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे. मसाबा आणि नीना यांचं बाँडिंग खूप चांगलं आहे. ‘मसाबा मसाबा’ या शोमधून तिचं तिच्या आईसोबतचं बाँडिंग पाहायला मिळालं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 16:06 IST
Next Story
Drishyam 2 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम २’चा बॉक्स ऑफिसवर डंका, दहा दिवसांत जमवला २०० कोटींचा गल्ला