scorecardresearch

“कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही…” सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल नीना गुप्ता यांनी व्यक्त केली हळहळ

नीना गुप्ता आणि सतीश कौशिक यांच्यात खूप छान मैत्री होती.

satish kaushik - neena gupta
सतीश कौशिक – नीना गुप्ता (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही एक व्हिडीओ शेअर करत सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं.

नीना गुप्ता आणि सतीश कौशिक यांच्यात खूप छान मैत्री होती. कॉलेजमध्ये असल्यापासून ती दोघं एकमेकांना ओळखत होती. आता त्यांच्या निधनाने नीना गुप्ता यांनाही धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत नीना गुप्ता यांनी त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला.

आणखी वाचा : “मी त्याला दम देऊन…” अनुपम खेर यांनी उधार घेतलेल्या पैशांबाबत सतीश कौशिकांनी केलेला खुलासा

नीना गुप्ता म्हणाल्या, “आज सकाळी एका दुःखद बातमीने मला जाग आली. ती बातमी म्हणजे सतीश कौशिक आता आपल्यात राहिले नाहीत. आमची ओळख खूप जुनी होती. तो मला नॅन्सी म्हणायचा आणि मी त्याला कौशिकन म्हणायचे. आमची भेट होवो किंवा न होवो…कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही एकमकांना ओळखायचो. आज तो आपल्यात नाही. ही बातमी खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्याची छोटी मुलगी वंशिका, त्याची पत्नी शशी…त्यांच्यासाठी हा खूप कठीण प्रसंग आहे आणि मी नेहमीच त्यांच्यासोबत आहे. देव त्यांना बळ देवो, खासकरून वंशिकला.”

हेही वाचा : सतीश कौशिक यांनी गरोदर असलेल्या नीना गुप्तांना घातली होती लग्नाची मागणी; म्हणाले होते…

दरम्यान आज संध्याकाळी ५ वाजता सतीश यांच्या पार्थिवार अंत्यविधी पार पडणार आहेत. वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर संध्याकाळी ५ वाजता वर्सोवा येथीलच हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 13:59 IST