हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज वाढदिवस. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आपल्या उत्तम अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली. आज नीतू ६५वा वाढदिवस साजरा करत आहेत. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची प्रेम कहाणी तर जगजाहीर आहेच. पण या दोघांच्या लग्नात नीतू कपूर बेशुद्ध पडल्या होत्या, हे फार कमी जणांना माहित आहे. तर आज आपण नीतू यांच्या वाढदिवसानिमित्त त्या लग्नात बेशुद्ध होण्यामागचं कारण काय होतं? हे जाणून घेऊयात.

१९७४ साली ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांची पहिली भेट झाली. ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाच्या वेळी ही पहिली भेट झाली होती. लगेच दोघांची मैत्रीही झाली. यादरम्यान नीतू अवघ्या १५ वर्षांच्या होत्या. तसेच यावेळी ऋषी कपूर यांची एक प्रेयसीही होती. पण या प्रेयसीबरोबर काहीतरी बिनसलं की ऋषी कपूर प्रेमपत्र लिहायचे. आणि नीतू यांच्या माध्यमातून ते प्रेमपत्र प्रेयसीपर्यंत पोहोचवतं असे. यामुळे ऋषी आणि नीतू यांची जवळीक वाढली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – प्रिया बापटनं ‘हा’ फोटो शेअर करत जुन्या आठवणींना दिला उजाळा; ओळखा पाहू ‘ही’ मालिका

हेही वाचा – संजय दत्तचा ‘त्या’ गाण्यावरील डान्स पाहून सरोज खान खुर्चीवरून पडल्या होत्या खाली; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?

याचवेळी ऋषी कपूर नीतू सिंह यांच्या प्रेमात पडले. मग ही गोष्ट राज कपूर यांना कळाली. त्यांनी थेट नीतूवर प्रेम करत असशील तर लग्न कर, असं ऋषी कपूरांना सांगितलं. पण नीतू यांच्या आईला हे आवडलं नव्हतं. पण काही काळ उलटल्यानंतर नीतू यांच्या आईनं ऋषी कपूर यांच्याबरोबर असलेल्या नात्याला स्वीकारलं. १९७९ साली ऋषी आणि नीतू यांचं लग्न झालं.

हेही वाचा – Video: राखी सावंत पुन्हा पतीच्या शोधात, भर पावसात डोक्यावर फोडली अंडी; नेटकरी म्हणाले, “हिच्यापेक्षा…”

पण या आनंदाच्या सोहळ्यात नीतू कपूर बेशुद्ध पडल्या. लग्नात घातलेल्या लेहेंग्याचं इतकं वजन होतं की ते नीतू यांना झेपतंच नव्हतं. यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला लग्नातली गर्दी पाहून ऋषी कपूर हैराण झाले होते.

Story img Loader