Neetu Singh-Kapil Sharma dance Video: नीतू सिंग बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांचे ७०-८० च्या दशकातील अनक सिनेमे गाजले आहेत. यामध्ये पवित्र पापी, हवस, यादों की बारात, रफू चक्कर, दीवार, खेल खेल में असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. काही काळ त्या सिनेमांपासून दूर राहिला. त्यानंतर २००९ ला प्रदर्शित झालेल्या लव्ह आज कल सिनेमातून त्यांनी पुनरागमन केले. आता लवकरच त्या आणखी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

दादी की शादी असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात कपिल शर्मा त्यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ते पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा ८ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यात या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता सिनेमातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. शुक्रवारी( १७ एप्रिल २०२६) सेंटी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे लक्ष वेधून घेत आहे.

नीतू सिंग लेक रिद्धिमा कपूर व नात समाराबरोबर थिरकल्या

३ मिनिटांचे हे गाणे आहे. या गाण्यात सर्वजण काळ्या पारंपारिक कपड्यांमध्ये आहेत. कपिल शर्माने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. या सगळ्यात नीतू सिंग यांच्या लूकने लक्ष वेधले. नीतू सिंग यांनी लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्या वधूच्या वेशात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे त्यांचे लग्न असल्याचे पाहायला मिळते.

या व्हिडीओमध्ये नीतू सिंग यांच्याबरोबर या गाण्यात त्यांच्या कुटुंबातील आणखी दोन व्यक्ती सेंटी गाण्यावर थिरकत असल्याचे दिसत आहे. या दोन व्यक्ती म्हणजे त्यांची मुलगी रिद्धीमा आणि नात समारा या दोघी आहेत. कपिल, नीतू, रिद्धीमा, समायरा आणि इतर कलाकार या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहेत. त्यांच्या साध्या, सोप्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत. रिद्धीमाचे हे अभिनयातील पदार्पण आहे. त्यामुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या गाण्याबद्दल बोलायचे तर हे गाणे पायल देव आणि आदित्य देव यांनी संगीतबद्ध केले आहे.

दादी की शादी सिनेमाची निर्मिती RTAKE स्टुडिओ, BeingU स्टुडिओ आणि शिमला टॉकीज प्रोडक्शन यांनी केली आहे. तर सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन आशिष आर. मोहन यांनी केले आहे. नीतू कपूर आणि कपिल शर्मा यांच्याबरोबरच या चित्रपटात आर. सारथ कुमार, सादिया खतीब, रिद्धिमा कपूर साहनी, योगराज सिंह यांसारखे अनेक कलाकार विविध भूमिकांत दिसणार आहेत.

नीतू सिंग याआधी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या जुगजुग जियो सिनेमात दिसल्या होत्या. या सिनेमात अनिल कपूर, वरुण धवन, कियारा अडवाणी, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

रिद्धिमा कपूर साहनीबद्दल बोलायचे तर ती याआधी द फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्हज या नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. तर कपिल शर्मा किस किसको प्यार करुँ २ मध्ये दिसला होता.