Neha Dhupia on husband Angad Bedi: नेहा धुपियाने बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘व्हिलन’, ‘रख्त’, ‘गांधी टू हिटलर’, ‘सिसकियाँ’, ‘सनक’, ‘तुम्हारी सुलू’, ‘बॅड न्यूज’, ‘रश’, ‘देवी’, ‘करीब करीब सिंगल’ अशा अनेक सिनेमांत नेहाने महत्त्वाच्या भूमिकांत काम केले आहे. याबरोबरच, काही रिॲलिटी शोमध्ये जज म्हणूनही तिने काम केले आहे.

आता नेहा धुपिया तिच्या अभिनय क्षेत्रातील कारकि‍र्दीमुळे नाही, तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नेहा धुपियाने एका मुलाखतीत तिच्या नवऱ्याबद्दल, त्याच्याबरोबरच्या बॉण्डिंगबद्दल वक्तव्य केले आहे.

“कामानिमित्त एकजण बाहेर असेल तेव्हाही त्याच्या कामाची….”

नेहा धुपियाने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तुझा पती तुला कसा पाठिंबा देतो? यावर नेहा म्हणाली, “तो खूप पाठिंबा देतो. मला वाटतं की जर तुमच्या वैवाहिक नात्यात मैत्री आणि मैत्रीत वैवाहिक नात्याची भावना असेल, तर तुमचे नाते उत्तम आहे.”

ती असेही म्हणाली की, आमच्यात समजूतदारपणा आहे. आम्ही न बोललेल्या गोष्टीही समजून घेतो. या सगळ्या गोष्टींमुळे आमचे नाते घट्ट झाले आहे. आमच्या दोघांपैकी एकाचा मूड खराब असेल तर, इतर काही अडचणी असतील तर दुसऱ्याने सांगण्याआधी ते समजून घेतले जाते. आम्ही आपापली जबाबदारी घेतो. ती म्हणाली, “आम्ही न बोलता एकमेकांच्या गोष्टी समजून घेतो. एकाचा मूड खराब असेल तर कोण काय करणार याची जबाबदारी घेतली जाते. मी हे करणार नाही असं सांगण्याची गरज पडत नाही. कामानिमित्त एकजण बाहेर असेल तेव्हाही त्याच्या कामाची कोण जबाबदारी घेणार, याबद्दल चर्चा करण्याची गरज नसते.”

नेहा पुढे म्हणाली, “आमचं नातं असंच आहे. त्याचे कामाचे काही दिवस चांगले असतील, काही दिवस कठीण असतील किंवा तो स्वतःच्या काही समस्यांमधून जात असेल, तर अशा वेळी मी त्याची बाजू सांभाळते आणि त्याची उणीव भरून काढते”, असे म्हणत नेहाने अंगदबरोबर कसे नाते आहे, याबद्दल सांगितले.

दरम्यान, नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी १० मे २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. दिल्लीमध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. २०१८ मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला, तर २०२१ मध्ये त्यांना मुलगा झाला. हे जोडपे सोशल मीडियावरही सक्रिय असते.