Netizens Reaction on Shraddha Kapoor Eetha Movie Trailer: बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘ईठा’ चित्रपटाचा ३ मिनिटे २ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्षावर आधारित या चित्रपटातील श्रद्धा कपूरचा तुफान अभिनय, दमदार संवाद आणि अजय-अतुलच्या अद्भूत संगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अवघ्या तासाभरात पावणेतीन लाख व्ह्यूज मिळवत हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून “श्रद्धा कपूरला या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळणारच,” अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ ४ डिसेंबरला रिलीज होणार आहे. ट्रेलरमधील श्रद्धा कपूरचा दमदार अभिनय आणि संवाद शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. ट्रेलरच्या शेवटी श्रद्धाचा एक मोठा डायलॉग आहे, तो तर कमाल आहे. युजर्सना हा ट्रेलर प्रचंड आवडलाय, कारण ट्रेलरवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
ईठा चित्रपटाचा ट्रेलर
ईठा चित्रपटाच्या ट्रेलरवरील प्रेक्षकांच्या कमेंट्स
‘नॅशनल अवॉर्ड येतोय,’ ‘श्रद्धा कपूर व रणदीप हुड्डाचा अभिनय आणि अजय-अतुलचं संगीत म्हणजे चित्रपट ब्लॉकबस्टर होणार,’ ‘२ मिनिट ११ व्या सेकंदाला श्रद्धाचा अभिनय कमाल आहे,’ ‘स्त्रीची ताकद,’ ‘श्रद्धाच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट,’ ‘सगळे मराठी आहेत, श्रद्धा अर्धी मराठी, लक्ष्मण उतेकर मराठी आणि अजय-अतुलही मराठी म्हणजे चित्रपट जबरदस्त असणारच,’ ‘चित्रपटात नाना पाटेकरही आहेत’, ‘श्रद्धा कपूर इज बॅक, बॉलीवूडमधील मुख्य अभिनेत्रीचा जबरदस्त परफॉर्मन्स,’ ‘जबरदस्त-श्रद्धा कपूरचं कमाल काम! ‘रामायण’ हा चित्रपट एका वेगळ्या श्रेणीतील आहे आणि त्याची तुलना इतर कशाशीही करणं योग्य ठरणार नाही, तरीही या ट्रेलरमुळे दोन्ही चित्रपटांतील संगीत आणि गाण्यांची तुलना नक्कीच केली जाईल. अजय-अतुल सरांनी उत्तम काम केलं आहे!’ अशा कमेंट्स या ट्रेलरवर पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, ‘ईठा’मध्ये श्रद्धा कपूर, रणदीप हुड्डा, दिवंगत नाना पाटेकर, मोहम्मद झीशान अय्युब, सिद्धार्थ जाधव, इश्तियाक खान, अनंत जोशी हे कलाकार आहेत.
