दक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ‘पुष्पा’ चित्रपटामुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या चित्रपटाने तिला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. या चित्रपटात तिची अल्लूबरोबरची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या चित्रपटातील सर्वच गाणी हिट ठरली आहेत. यातील ‘सामी सामी’ हे गाणे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. रश्मिका पुन्हा एकदा या गाण्यावर थिरकली आहे.

चित्रपटातील एखादे गाणे हिट होते आणि त्या गाण्यावर अभिनेत्रींना कायमच थिरकावे लागते. रश्मिका नुकतीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हैदराबाद येथे गेली होती. या कार्यक्रमात ती पुन्हा एकदा या गाण्यावर नाचली, तिच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी नाराजीचा सूर ओढवला आहे तर काही जणांनी या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांची थट्टा केली आहे . एकाने लिहले आहे ‘आम्हाला हे बघून कंटाळा आला आहे’ तर दुसर्याने लिहले आहे ‘हिला फक्त इतकंच करता येत का’? आणखीन एकाने लिहले आहे ‘किती दिवस हेच करणार आम्ही कंटाळो आहोत’. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ‘व्हिडिओमध्ये रश्मिकाच्या मागे जी मुलगी आहे तिचे हावभाव बघा’.

जुळ्या मुलांना गाणे ऐकवायला गेला करण जोहर, वैतागून त्यांनी केलं असं काही की…

सध्या रश्मिका ही गुडबाय या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने पहिल्यांदा अमिताभ बच्चन याच्याबरोबर काम केले आहे. सध्या तिचे नाव विजय देवरकोंडांबरोबर जोडले जात आहे. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. दोघांनी ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

रश्मिकाने २०१६ मध्ये ‘किरिक पार्टी’ (Kirik Party) या कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून कारकीर्दीची सुरुवात केली होती. ल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे तिची लोकप्रियता वाढली. तिने साकारलेल्या श्रीवल्ली या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. पुष्पा २ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भागात पुन्हा एकदा अल्लू रश्मिका ही जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे.