अनेक सेलिब्रिटी गणेशोत्सवानिमित्त लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. अशातच दिग्दर्शिका व नृत्यदिग्दर्शिका फराह खानदेखील गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली. तिचा लालबागचा राजाच्या दर्शनाला जात असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत फराहला तिच्या मैत्रिणी पकडून नेताना दिसत आहेत.

Video: अधिकारी समीर वानखेडे अन् अभिनेत्री क्रांती रेडकरने घेतले लालबागचा राजाचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत फराह खान लालबागच्या दर्शनाला आल्याचं दिसतंय. एका व्हिडीओत ती, अभिनेता सोनू सूद, शेखर सुमन गर्दीत रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. व्हीआयपी रांगेतून न जाता त्यांनी सर्वसामान्यांबरोबर गर्दीतून बाप्पाचे दर्शन घेतले.

दुसऱ्या एका व्हिडीओत फराह खानला तिच्या मैत्रिणींनी पकडल्याचं दिसतंय. पण तिथे फार गर्दी नाही, रस्त्यावरून चाहताना फराहला मैत्रिणी दोन्ही हात पकडून नेताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

‘पहिल्या नजरेत मला वाटलं की ती बेशुद्ध होणार आहे’, ‘अगदी पद्धतशीर तिला ओढून नेत आहेत’, ‘दारू प्यायली आहे का?’ ‘ही रुग्णालयात जातेय की दर्शनाला?’ ‘रस्त्यावर गर्दी नाही, ट्रॅफिक नाही तरी ही अशी का चालतेय, बहुतेक दारू प्यायली आहे’, अशा कमेंट्स युजरनी केल्या आहेत.

farah khan troll
फराह खानच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)
farah khan troll
फराह खानच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशी फराह खान, राजकुमार रावची पत्नी पत्रलेखा आणि हुमा कुरेशी यांचा एक फोटो समोर आला होता. त्यात या तिघी एकत्र गणेशोत्सव साजरा करताना दिसल्या. फोटोत फराहने पायात चप्पल घातली होती, त्यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं.

Story img Loader