Nikita Rawal Viral Video : सेलिब्रिटींचे चाहते कधी काय करतीय याचा काहीच नेम नसतो. अनेक इव्हेंट, शोदरम्यान अशा बऱ्याच विचित्र घटना घडतात. नुकत्याच एका शोदरम्यान लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर अशीच एक घटना घडली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
रेड कार्पेटवर अभिनेत्री निकिता रावल कॅमेऱ्यासमोर पोज देत असताना नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. निकिताबरोबर फोटो काढण्यासाठी एक चाहती धावत तिच्या दिशेने जाते. अभिनेत्री सुद्धा अगदी आनंदाने तिचं स्वागत करते. यानंतर ही चाहती अभिनेत्रीला एका बाजूने मिठी मारते आणि फोटो काढताना अचानक निकिताला लिपलॉक किस करते.
चाहतीने अचानक किस केल्यावर निकिता तिला दूर ढकलण्याचा खूप प्रयत्न करताना दिसतेय. शेवटी सुरक्षारक्षक पुढे येऊन या चाहतीला घेऊन जातात, असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे निकिता प्रचंड धक्का बसलाय. अवघ्या काही सेकंदात आपल्याबरोबर नेमकं काय घडलं हे सुद्धा निकिताला नीट समजलं नाही. चाहतीच्या या भयंकर कृत्याने निकिताला शॉक बसला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी निकिता रावलला सपोर्ट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिला याबाबत पोलिसांत तक्रार कर असाही सल्ला दिला आहे. तर काही नेटकऱ्यांनी हा पीआर स्टंट असल्याचं म्हटलं आहे.
कोण आहे निकिता रावल?
निकिता रावल ही प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना आणि निर्माती म्हणून ओळखली जाते. २०१० पासून तिने बॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याशिवाय निकिताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केलेलं आहे.
ब्लॅक अँड व्हाइट, मिस्टर हॉट मिस्टर कूल, द हिरो-अभिमन्यू, अम्मा की बोली, गरम मसाला, क्सुटनेस कमिना यासांरख्या सिनेमांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच निकिता रोटी कपडा और रोमान्स सिनेमात झळकणार आहे. यामध्ये अर्शद वारसी, चंकी पांडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असतील.
